भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यानुसार माजी नगरसेवक नागेश अक्कलकोट यांच्यावर गुन्हा दाखल...

बार्शी ( प्रतिनिधी ) बार्शी शहर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 970/2024 भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन 1988 चे कलम 13 (1) (ई) व 13 (2) तसेच सुधारित भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन 2018 चे कलम 13 (1) (ब) व 13 (2) सह भारतीय दंड संहिता सन 1860 चे कलम 109 प्रमाणे उमाकांत नेताजी महाडिक पोलीस निरीक्षक, लाचलुचपत प्रतिबंध विभाग 1) नागेश हरीभाऊ अक्कलकोटे 2) कल्पना नागेश अक्कलकोटे यांनी दि.09/06/2001 ते दि. 31/08/2022 या परीक्षण कालावधीदरम्यान त्यांचे व त्यांचे पत्नीचे नावे त्यांच्या सर्व ज्ञात उत्पन्नाचे स्त्रेतापासून मिळालेल्या एकुण उत्पन्नातुन खर्च तसेच मालमत्ता वजा जाता 11,12,13,816.52/- रुपये जास्तीची रक्कम (अपसंपदा) संपादीत केलेली असून सदरची संपादित
केलेली मालमत्ता ही अपसंपदा आहे हे माहित असतानाही त्यांची पत्नी सौ. कल्पना नागेश अक्कलकोटे यांनी सदर अपसंपदा स्वतःचे कब्जात बाळगुन गैरअर्जदार नागेश हरीभाऊ अक्कलकोटे यांना भ्रष्ट मार्गाने अपसंपदा संपादित करण्यास अपप्रेरणा व सहाय्य केले असलेने माझी लोकसेवक नागेश हरीभाऊ अक्कलकोटे व त्यांची पत्नी सौ. कल्पना नागेश अक्कलकोटे यांच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन 1988 चे कलम 13 (1) (ई) व 13 (2) तसेच सुधारित भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन 2018 चे कलम 13 (1) (ब) व 13 (2) सह भारतीय दंड संहिता सन 1860 चे कलम 109 प्रमाणे माझी त्यांचे विरूध्द कायदेशीर फिर्याद आहे. म्हणून वगैरे मजकुरची फिर्याद दिल्याने प्रोव्ही रजि दाखल करुन गुन्ह्याचा वर्दी रिपोर्ट मे. कोर्टात पाठवुन देण्याची तजवीज ठेवुन सदर गुन्हाचा पुढील तपास मा. पोनि गणेश पिंगुवाले, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सोलापूर, यांचेकडे दिला आहे..

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

**ऑनलाइन रम्मीच्या व्यसनाने घेतला तिघांचा बळी; धाराशिवच्या बावी गावात कुटुंबाचा करुण अंत**

**बार्शीत १३ वर्षीय मुलाचे अपहरण; पोलिसांचा शोध सुरू**

मुख्याध्यापकांची निर्दोष मुक्तता: बार्शी न्यायालयाचा निकाल