बार्शी शहर गुन्हे प्रकटीककरण शाखेची उल्लेखनीय कामगिरी...

बार्शी शहर गुन्हे प्रकटीककरण शाखेची उल्लेखनीय कामगिरी

KDM NEWS बार्शी : प्रतिनिधी

 शहरातील बुरुड गल्ली येथे भरदिवसा घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार २४ तासांच्या आत जेरबंद करण्यात आला, तसेच त्याच्याकडून घरफोडीतून चोरी केलेला ४,२९,२५०/- रुपये किमंतीचा मुदेमाल हस्तगत करण्यात आला.

घटना दि. १४ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता घडली. फिर्यादी प्रविण शिवशंकर थळकरी हे त्यांच्या घरामध्ये कामानिमित्त बाहेर गेले होते. यावेळी अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून ४३ ग्रॅम सोन्याचे दागिने, ५ ग्रॅम चांदीच्या वस्तू, एक एल.ई.डी. टीव्ही आणि १५,०००/- रुपयांची रोख रक्कम चोरून नेली होती. या घटनेची माहिती मिळाल्यावर बार्शी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पो.उप.नि. उमाकांत कुंजीर व इतर पोलीस कर्मचार्यांना गुन्ह्याचा शोध घेण्याचे आदेश दिले.

गुन्हे प्रकटीकरण पथकाने तपास सुरु केला आणि अज्ञात आरोपीची माहिती मिळाली. तपासाच्या आधारावर आरोपी नागेश राजु बगाडे (रा. बार्शी) याला अटक करण्यात आली. त्याच्या चौकशीतून गुन्हा उघडकीस आला आणि आरोपीकडून चोरी केलेला ४,२९,२५०/- रुपये किमंतीचा मुदेमाल हस्तगत करण्यात आला. यामध्ये १६ तोळे सोन्याचे दागिने, चांदीच्या वस्तू, एल.ई.डी. टीव्ही व १४,०००/- रुपये रोख रक्कम समाविष्ट आहे.

सदर आरोपीवर मुंबई शहर, पुणे शहर आणि बार्शी शहर पोलिस ठाण्यात घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. या कामगिरीला अपर पोलीस अधिक्षक प्रीतम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी जालींदर नालकुल आणि पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली बार्शी शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेने यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे. पुढील तपास पो.उप.नि. उमाकांत कुंजीर हे करीत आहेत.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

**ऑनलाइन रम्मीच्या व्यसनाने घेतला तिघांचा बळी; धाराशिवच्या बावी गावात कुटुंबाचा करुण अंत**

**बार्शीत १३ वर्षीय मुलाचे अपहरण; पोलिसांचा शोध सुरू**

मुख्याध्यापकांची निर्दोष मुक्तता: बार्शी न्यायालयाचा निकाल