विनोद कांबळीच्या मेंदूत गुठळ्या, उपचार सुरू; सचिन तेंडूलकरचे आभार मानले

विनोद कांबळीच्या मेंदूत गुठळ्या, उपचार सुरू; सचिन तेंडूलकरचे आभार मानले

KDM NEWS प्रतिनिधी :-टीम इंडियाचा माजी डावखुरा फलंदाज विनोद कांबळी याला शनिवारी रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले होते. ठाण्याच्या आकृती हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्याच्या चाचण्या करण्यात आल्या, ज्यामध्ये कांबळीच्या मेंदूत गुठळ्या आढळल्या आहेत. या परिस्थितीमुळे त्याच्या प्रकृतीबद्दल चिंता निर्माण झाली होती, पण आता उपचार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

विनोद कांबळीने एक व्हिडिओ शेअर केला, ज्यात त्याने आपल्या तब्येतीबाबत माहिती दिली. "मी इथल्या डॉक्टरांमुळेच जिवंत आहे. डॉक्टर जे सांगतील ते मी करेन. माझ्या जीवनाच्या प्रेरणा लोकांना दिसतील," असे कांबळी म्हणाले. त्याने क्रिकेटच्या आठवणींना उजाळा देताना, "मी कधीही क्रिकेट सोडणार नाही, आणि मी किती शतक व अर्धशतक ठोकली ते मला चांगले आठवते," असेही सांगितले.

विनोद कांबळीने आपल्या मुलाच्या क्रिकेटप्रती प्रेमाबद्दल सांगताना, "माझा मुलगा देखील डावखुरा फलंदाज आहे. जीवनाचा आनंद घ्या आणि दारू पिऊ नका," असे आवाहन केले. त्याने सचिन तेंडूलकरचे आभार मानले आणि सांगितले, "सचिनचे आशीर्वाद माझ्यासोबत आहेत."

विनोद कांबळीच्या प्रकृतीला लक्षात घेत रुग्णालयाचे प्रभारी एस. सिंग यांनी कांबळीला आयुष्यभर मोफत उपचार देण्याचा निर्णय घेतला आहे. कांबळीने सुरूवातीला मूत्रमार्गातील संसर्ग आणि पेटके आल्याची तक्रार केली होती, आणि त्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच्यावर उपचार सुरू असून, येत्या चार ते पाच दिवसात त्याला डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे.

#VinodKambli #SachinTendulkar #Cricket #Kambli #ViralPost2024 #CricketLovers #NewsUpdate #kdmnews #watch #maharashtra

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

**ऑनलाइन रम्मीच्या व्यसनाने घेतला तिघांचा बळी; धाराशिवच्या बावी गावात कुटुंबाचा करुण अंत**

**बार्शीत १३ वर्षीय मुलाचे अपहरण; पोलिसांचा शोध सुरू**

मुख्याध्यापकांची निर्दोष मुक्तता: बार्शी न्यायालयाचा निकाल