**बार्शी एसटी स्टँड चौकात वाहतूक कोंडीला आळा घालण्यासाठी रिक्षा संघटनेची मागणी**
**बार्शी एसटी स्टँड चौकात वाहतूक कोंडीला आळा घालण्यासाठी रिक्षा संघटनेची मागणी**
**KDM NEWS प्रतिनिधी बार्शी, दि. २५ डिसेंबर २०२५ : बार्शी शहरातील एसटी बस स्टँड चौकात सतत होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे अपघातांचा धोका वाढला असून, येथे कायमस्वरूपी ट्रॅफिक हवालदार नेमण्याची मागणी भगवंत रिक्षा संघटना बार्शी चालक-मालकांनी केली आहे. या चौकात लातूरकडून येणाऱ्या आणि सोलापूरकडे जाणाऱ्या बसगाड्यांसाठी एकच जागा असल्याने, तसेच याच ठिकाणी रिक्षा स्टॉप असल्याने गोंधळ निर्माण होत असल्याचे संघटनेने नमूद केले. या परिसरात व्यावसायिक दुकाने आणि लोकांची गर्दी असल्याने समस्या अधिक गंभीर बनली आहे.
संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी बार्शी शहर पोलिस स्टेशनचे निरीक्षक यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, यापूर्वी पोलिसांकडून ट्रॅफिक हवालदार नेमण्याचे आश्वासन देण्यात आले होते, मात्र अद्याप त्याची अंमलबजावणी झालेली नाही. यामुळे अपघात आणि गोंधळ वाढला असून, लवकरात लवकर नेमणूक करण्याची विनंती करण्यात आली आहे. तसेच, बस स्टँडच्या आवारात बेशिस्त रिक्षांचा मुक्त वावर असल्याने चोरट्यांना पळून जाणे सोपे होते, ज्यामुळे चोऱ्यांचे प्रमाण वाढले असल्याचेही निवेदनात नमूद आहे. यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या