**बार्शी शहरात पाणीपुरवठा सुरळीत; पिवळसर पाणी पिण्यायोग्य : अभियंता**
**बार्शी शहरात पाणीपुरवठा सुरळीत; पिवळसर पाणी पिण्यायोग्य : अभियंता**
**KDM NEWS बार्शी (प्रतिनिधी) : बार्शी शहरातील पाणीपुरवठा यंत्रणेतील अडचणी दूर झाल्या असून, पुरवठा पूर्णपणे सुरळीत झाला आहे. गेल्या आठवड्यात बार्शी, कंदर आणि कुर्डूवाडी परिसरात सलग तीन दिवस वीज पुरवठा खंडित झाल्याने उजनी धरणातून येणारा पाणीपुरवठा बंद पडला होता. मात्र, आता वीज समस्या सुटल्याने पाणीपुरवठा पूर्ववत झाला असून, यापुढे स्वच्छ आणि नियमित पाणी मिळेल, असे बार्शी नगरपालिकेचे जलदायी अभियंता अजय होनखाबे यांनी स्पष्ट केले.
नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागाकडून शहरातील नागरिकांच्या आरोग्यरक्षणासाठी दरमहा सुमारे ८० वेळा पाण्याची चाचणी जिल्हा प्रयोगशाळेत केली जाते. यात दररोज तीन वेळा नमुने पाठवले जातात. सध्या चांदणी तलावातून पुरवठा होणारे पाणी पिवळसर दिसत असले तरी चाचण्यांनुसार ते पूर्णपणे पिण्यायोग्य आहे. विभागाकडून फिल्टरेशन प्रक्रियेवर विशेष लक्ष देण्यात येत असून, पाईपलाईन दुरुस्ती आणि देखभाल कामे युद्धपातळीवर सुरू आहेत.
शहरातील काही भागांत काळे-पिवळे आणि अस्वच्छ पाणी येण्याच्या तक्रारी मागील महिन्यात वाढल्या होत्या. यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत होती. मात्र, मुख्याधिकारी तैमूर मुलाणी यांनी सांगितले आहे.
नागरिकांनी पाण्याचा अपव्यय टाळावा आणि तक्रारी असल्यास नगरपालिका विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन अभियंत्यांनी केले आहे. या प्रयत्नांमुळे बार्शी शहरातील पाणीपुरवठा यंत्रणा अधिक मजबूत होईल, असा विश्वास व्यक्त होत आहे.
टिप्पण्या