**विजय दिवस २०२५: देशभरात साजरा ऐतिहासिक विजयाचा दिवस**

**विजय दिवस २०२५: देशभरात साजरा ऐतिहासिक विजयाचा दिवस** 

**KDM NEWS प्रतिनिधी**नवी दिल्ली, १६ डिसेंबर २०२५: आज देश विजय दिवस साजरा करत आहे. १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धात भारतीय सशस्त्र दलांनी मिळवलेल्या निर्णायक विजयाची आणि बांगलादेश मुक्तीची आठवण करून देताना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वीर जवानांना श्रद्धांजली वाहिली.

१९७१ च्या १३ दिवसांच्या युद्धात भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या ९३ हजार सैनिकांचे आत्मसमर्पण घडवले होते. या विजयाने पूर्व पाकिस्तान स्वतंत्र होऊन बांगलादेशचा जन्म झाला.

पंतप्रधान मोदी म्हणाले, "विजय दिवसानिमित्त १९७१ मधील ऐतिहासिक विजयासाठी शौर्य आणि बलिदान देणाऱ्या वीर जवानांना सलाम. त्यांचा दृढनिश्चय आणि निस्वार्थ सेवा देशासाठी प्रेरणादायी आहे."

राष्ट्रपती मुर्मू यांनीही वीर सैनिकांच्या शौर्याला वंदन केले. दिल्लीत आर्मी हाऊसमध्ये 'ऍट होम' कार्यक्रमात स्वदेशी तंत्रज्ञानाचे प्रदर्शन झाले.

देशभरात युद्ध स्मारकांवर पुष्पांजली अर्पण करून शहीदांना श्रद्धासुमन वाहण्यात आले. जय हिंद!

KDM NEWS प्रतिनिधी 

टिप्पण्या