**बार्शीतील चिमुकल्यांचा समुद्रात जलपराक्रम : फ्लिपर्स स्वीम क्लबचे राज्यस्तरीय यश**

**बार्शीतील चिमुकल्यांचा समुद्रात जलपराक्रम : फ्लिपर्स स्वीम क्लबचे राज्यस्तरीय यश** 

**KDM NEWS प्रतिनिधी मालवण, दि. १७ : बार्शीतील कर्मवीर जलतरण तलावातील फ्लिपर्स स्वीम क्लबच्या बाल खेळाडूंनी मालवण येथे झालेल्या राज्यस्तरीय समुद्र जलतरण स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधले. अवघ्या ४ वर्षांच्या चिमुकल्यांपासून ते मोठ्या वयोगटातील खेळाडूंनी खडतर समुद्री आव्हानांना तोंड देत ५०० मीटर ते १० किलोमीटर अंतर पार केले.

स्पर्धा १३ व १४ डिसेंबर रोजी दोन दिवस चालली. यात राज्यभरातील खेळाडूंनी भाग घेतला. फ्लिपर्स क्लबच्या खेळाडूंनी उंच लाटा, जोरदार प्रवाह आणि कठीण वातावरणातही धैर्य व कौशल्य दाखवले. हे यश प्रशिक्षकांच्या मार्गदर्शन व नियमित सरावाचे परिणाम असल्याचे प्रशिक्षक बाळराजे पिंगळे यांनी सांगितले.

यशस्वी खेळाडूंची यादी अशी :
- हृदयांश डोईफोडे बार्शी (४ वर्ष) : ५०० मीटर
- एकांश भोसले (४ वर्ष) बार्शी: ५०० मीटर
- शिवराज बारबोले (९ वर्ष) बार्शी: १ किलोमीटर
- दर्शन चव्हाण बार्शी (९ वर्ष) : १ किलोमीटर
- तन्वी नवले बार्शी (९ वर्ष) : १ किलोमीटर व १० किलोमीटर
- शौर्य नवले बार्शी (१० वर्ष) : २ किलोमीटर व १० किलोमीटर
- जान्हवी वास्कर : ३ किलोमीटर व १० किलोमीटर
- माधव शिंदे : ३ किलोमीटर व १० किलोमीटर
- जयसिंह शिंदे : ३ किलोमीटर व १० किलोमीटर
- रुद्र नवले : १० किलोमीटर

पालक, श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी , शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य व क्रीडाप्रेमींनी खेळाडूंचे अभिनंदन केले. भविष्यात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवण्याच्या शुभेच्छा दिल्या. ही स्पर्धा बाल खेळाडूंच्या समुद्री जलतरण क्षमतेचा नवा अध्याय रचणारी ठरली.

KDM NEWS प्रतिनिधी 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

**बनावट खतांच्या मोठ्या साठ्यावर कृषी विभागाची धडक कारवाई; सोलापूरमध्ये शेतकऱ्यांची लाखोंची फसवणूक उघड, दोघांवर गुन्हा दाखल**

मुख्याध्यापकांची निर्दोष मुक्तता: बार्शी न्यायालयाचा निकाल

**बार्शी बाजार समितीत शेतकऱ्यांची लूट: वरद ट्रेडर्सच्या चोरीचा व्हिडिओ व्हायरल, ड्रायव्हरांना कमिशन देऊन माल आणण्याचा गोरखधंदा**