*बार्शी येथे संभाजी ब्रिगेडतर्फे राष्ट्रमाता जिजाऊ जयंती उत्साहात साजरी*
*बार्शी येथे संभाजी ब्रिगेडतर्फे राष्ट्रमाता जिजाऊ जयंती उत्साहात साजरी*
*KDM NEWS प्रतिनिधी बार्शी, दि. १२ : स्वराज्य प्रेरिका राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेबांची जयंती आज स्टॉप बार्शी येथे संभाजी ब्रिगेडच्या वतीने उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष आनंद काशीद यांनी जिजाऊंच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला आणि छत्रपती शिवाजी महाराजांना घडविण्यातील त्यांच्या योगदानाचे महत्व अधोरेखित केले.
कार्यक्रमात बोलताना आनंद काशीद म्हणाले, "ज्या काळात मोगल, आदिलशाही आणि निजामशाही यांच्या सत्तेचा उन्माद महाराष्ट्रात माजला होता आणि मानवतेला काळीमा फासणाऱ्या घटना घडत होत्या, त्या कठीण काळात राष्ट्रमाता जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्याची प्रेरणा दिली. त्यांनी १८ पगड जाती आणि १२ बलुतेदारांना एकत्र करून स्वराज्य स्थापनेचे बीज रोवले. जिजाऊंनी शिवरायांच्या बुद्धीचतुराईने मानवतेला भूषण वाटेल असे स्वराज्य निर्माण केले. छत्रपती शिवराय आणि संभाजी महाराजांच्या जीवनातून प्रेरणा घेऊन आपण आयुष्याचा प्रवास करायला हवा."
यावेळी सामाजिक कार्यकर्त्या शितल मांजरे यांच्या हस्ते जिजाऊंच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाला विक्रम बापू गायकवाड, मनोज मोरे, इमाम भाई लांडगे, सय्यद राजवीर काशीद यांच्यासह मोठ्या संख्येने जिजाऊ प्रेमी उपस्थित होते. हा सोहळा स्वराज्याच्या मूल्यांवर आधारित सामाजिक एकतेचे प्रतीक ठरला.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या