**बार्शी तालुक्यात जातीवाचक शिवीगाळ व मारहाण; दलित मजुराला चाकू व दगडाने जखमी केल्याचा गुन्हा**
**बार्शी तालुक्यात जातीवाचक शिवीगाळ व मारहाण; दलित मजुराला चाकू व दगडाने जखमी केल्याचा गुन्हा दाखल**
**KDM NEWS प्रतिनिधी बार्शी (सोलापूर), २ मे २०२६:** बार्शी तालुक्यातील कव्हे गावात पैशाच्या वादातून दोघा आरोपींनी एका दलित मजुराला जातीवाचक शिवीगाळ करून दगड, लाथाबुक्क्यांनी आणि चाकूने जखमी केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी बार्शी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी लक्ष्मण अभिमान चव्हाण (वय २९, धंदा- मजुरी, जात- हिंदू चांभार, रा. कव्हे, ता. बार्शी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, शुक्रवारी (१ मे २०२६) सकाळी साडेनऊच्या सुमारास कव्हे गावातील अनिल हजारे यांच्या खवा भट्टीजवळ व हनुमान विद्यामंदिर शाळेजवळ ही घटना घडली. आरोपी अनिल दत्तात्रय हजारे व आदित्य शंकर राऊत (दोघे रा. कव्हे) यांनी फिर्यादीने दिलेले पैसे परत मागितल्याने वाद निर्माण झाला. त्यानंतर आरोपींनी जातीवाचक शिवीगाळ करत हाताने, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. दगडाने डोक्यात वार करून जखमी केले आणि जवळील चाकूनेही वार केल्याचे फिर्यादीने सांगितले आहे.
या घटनेत लक्ष्मण चव्हाण यांना गंभीर जखमा झाल्या असून, त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले आहेत. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला आहे.
**नोंदवलेल्या कलमांनुसार गुन्हा:**
- भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ११५(२), ११८(१), ३(५)
- अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती कायदा कलम ३(१)(r)(s)
बार्शी तालुका पोलीस ठाण्यात गु.र. नं. १३३/२०२६ नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास प्रभारी अधिकारी व आय.पी.एस. अंजना कृष्णा, उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.
ही घटना स्थानिक पातळीवर चर्चेचा विषय बनली असून, जातीवाचक अत्याचाराच्या घटनांबाबत पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी परिसरात गस्त वाढवली आहे.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या