**देशी-विदेशी दारू, बिअर आणि व्हिस्कीचा साठा पोलिसांच्या ताब्यात! बार्शीत मोठी कारवाई**
**देशी-विदेशी दारू, बिअर आणि व्हिस्कीचा साठा पोलिसांच्या ताब्यात! बार्शीत मोठी कारवाई**
**KDM NEWS बार्शी (प्रतिनिधी):** स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीण यांच्या पथकाने बार्शी उपविभागातील सौंदरे परिसरात मोठी कारवाई करत अवैध दारू वाहतुकीचा साठा जप्त केला आहे. या कारवाईत देशी-विदेशी मद्य, वाहन आणि मोबाईल मिळून एकूण १ लाख ५९ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी अमित अशोक तुपेरे (वय ३२, रा. खंडोबा मंदिराजवळ, सौंदरे, ता. बार्शी) याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५ (अ) आणि ६५ (ई) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दि. ११ मे २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बार्शी-सोलापूर रोडवर सापळा रचला. गोपनीय माहितीवरून पांढऱ्या रंगाच्या मारुती सुझुकी ओमनी वाहनातून अवैध दारू वाहतूक होत असल्याचे समजले. पोलिसांनी वाहन थांबवून तपासणी केली असता त्यात मोठ्या प्रमाणात देशी व विदेशी मद्य साठा आढळला.
**जप्त मुद्देमालाची यादी:**
- बडवायझर, किंगफिशर बिअर
- ढोकी संत्रा देशी दारू
- रॉयल स्टॅग व कासीक गोल्ड व्हिस्की
या सर्व बाटल्यांची एकूण किंमत ४९ हजार ९२० रुपये इतकी आहे. याशिवाय वाहतुकीसाठी वापरलेली मारुती सुझुकी ओमनी वाहन आणि एक विवो कंपनीचा मोबाईल असा १ लाख १० हजार रुपयांचा अतिरिक्त मुद्देमाल जप्त करण्यात आला. प्रत्येक कंपनीच्या बाटल्यांचे नमुने सीलबंद करून सीए तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. पंचनामा करून आरोपीला ताब्यात घेण्यात आले.
**बार्शीमध्ये अवैध धंद्यांवर वाढते नियंत्रण**
बार्शी शहर व तालुक्यात गेल्या काही दिवसांत अवैध दारू, गुटखा, मटका आणि गांजा यासारख्या अवैध धंद्यांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून वारंवार कारवाया झाल्या आहेत. स्थानिक पोलीस प्रशासनाकडून मात्र अशा धंद्यांवर सक्रिय कारवाई अपुरे पडत असल्याचे चित्र दिसून येत आहे. यामुळे स्थानिक गुन्हे शाखेलाच वारंवार बार्शी परिसरात येऊन कारवाई करावी लागत आहे. नागरिकांनी अशा अवैध धंद्यांबाबत माहिती दिल्यास तातडीने कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले आहे.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या