**पेट्रोल-डिझेल संपुष्टात येणार? भुजबळांनी वाढवली नागरिकांची धास्ती**
**पेट्रोल-डिझेल संपुष्टात येणार? भुजबळांनी वाढवली नागरिकांची धास्ती**
**KDM NEWS प्रतिनिधी मुंबई, २० मे २०२६:** राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आज विधानसभा परिसरात केलेल्या विधानाने महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. त्यांनी स्पष्ट केले की, सध्या राज्यात उपलब्ध असलेला पेट्रोल आणि डिझेलचा साठा केवळ **एक महिना** पुरेल एवढाच आहे.
भुजबळ म्हणाले, “आमच्याकडे सध्या फक्त एक महिन्याचा साठा शिल्लक आहे. केरोसीनचा साठा मुबलक आहे, परंतु वाटप व्यवस्था बिघडली आहे. त्यासाठी विशेष पथके नेमण्यात येत आहेत.” त्यांनी नागरिकांना घाबरून अतिरिक्त इंधन साठवू नये, असे आवाहनही केले आहे.
या विधानानंतर राज्यभरातील पेट्रोल पंपांवर नागरिकांची गर्दी वाढली आहे. मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, जळगाव, नांदेड, परभणीसह ग्रामीण भागात अनेक पंपांवर वाहनांच्या लांब रांगा लागल्या आहेत. काही ठिकाणी “नो स्टॉक”चे फलक लावण्यात आले आहेत.
जागतिक कारण
मध्यपूर्वेतील वाढता तणाव, विशेषतः इराण-अमेरिका-इस्रायल यांच्यातील परिस्थिती आणि होर्मुझ सामुद्रधुनीतील संभाव्य अडथळ्यांमुळे कच्च्या तेलाच्या पुरवठ्यात व्यत्यय आला आहे. याचा परिणाम भारताच्या इंधन आयातीवर झाला असून, महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्याला त्याचा फटका बसला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही नागरिकांना इंधन जपून वापरण्याचे आवाहन केले आहे.
सरकारचे आश्वासन
मंत्रिमंडळातील सूत्रांनी सांगितले की, केंद्र सरकारशी समन्वय साधून पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. साठेबाजी आणि काळाबाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही भुजबळ यांनी दिला आहे.
एलपीजीबाबतही भुजबळ यांनी सूचना केली. PNG पाइपलाइन उपलब्ध असलेल्या भागात ३० जूनपर्यंत अर्ज करा, अन्यथा सिलिंडर पुरवठा बंद होऊ शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले.
नागरिकांची प्रतिक्रिया
“पेट्रोल घ्यायला गेलो तर पंपावर रांग लागली आहे. एक-दोन दिवस पुरेल एवढेच मिळाले,” अशी तक्रार पुण्यातील एका नागरिकाने केली. दुसरीकडे, “सरकारने आधीच सावधगिरी बाळगायला हवी होती,” अशी नाराजी व्यक्त होत आहे.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या