**जिल्हास्तरीय बँक सल्लागार समिती बैठक: कर्ज नाकारल्यास लेखी कारण द्यावे जिल्हाधिकारी**

**जिल्हास्तरीय बँक सल्लागार समिती बैठक: कर्ज नाकारल्यास लेखी कारण द्यावे; जिल्हाधिकारी** 

**KDM NEWS प्रतिनिधी सोलापूर, २१ मे** — जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय बँक सल्लागार समितीची बैठक आज संपन्न झाली. या बैठकीत कर्जवितरण प्रगती, खातेउघडणी आणि शासकीय उद्दिष्टांच्या अंमलबजावणीचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी स्पष्ट निर्देश दिले की, **ज्या लाभार्थ्यांचे कर्ज अर्ज नाकारले जातील, त्यांना बँकेने नेमके कारण लेखी स्वरूपात कळवणे बंधनकारक** आहे. कर्ज मंजुरी आणि नकार प्रक्रियेत पूर्ण पारदर्शकता राखण्यावर भर देण्यात आला.

बैठकीत सर्व बँकांनी जिल्हा अग्रणी बँकेने दिलेली उद्दिष्टे **१०० टक्के पूर्ण** करणे बंधनकारक असल्याचे सांगण्यात आले. यासाठी प्रभावी नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच प्रत्येक बँकेने **खातेउघडणीचे ७५ टक्के उद्दिष्ट** पूर्ण करण्याची सूचना देण्यात आली.

काही बँकांच्या कामगिरीबाबत असमाधान व्यक्त करत जिल्हाधिकाऱ्यांनी ठरवून दिलेली पीककर्ज उद्दिष्टे पूर्ण न करणाऱ्या आणि शासकीय योजनांमध्ये दिरंगाई करणाऱ्या बँकांवर कारवाईचे संकेत दिले. **ॲक्सिस बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, बंधन बँक आणि करूर वैश्य बँक** यांना जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापकांनी नोटीस बजावण्याचे निर्देश देण्यात आले.

बैठकीत नाबार्ड, ओबीसी महामंडळ, जिल्हा कृषी विभाग आणि जिल्हा उद्योग केंद्र (DIC) यांच्या योजनांच्या प्रगती, निधी उपलब्धता आणि अंमलबजावणीत येणाऱ्या अडचणींवर चर्चा झाली.

यावेळी जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक राम वाखार्डे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले, जिल्हा उद्योग केंद्र महाव्यवस्थापक उमेशचंद्र दंडगव्हाळ, ओबीसी महामंडळ जिल्हा व्यवस्थापक वृषाली लहारे यांच्यासह विविध राष्ट्रीयकृत, खाजगी आणि सहकारी बँकांचे अधिकारी उपस्थित होते.


KDM NEWS प्रतिनिधी 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

**बनावट खतांच्या मोठ्या साठ्यावर कृषी विभागाची धडक कारवाई; सोलापूरमध्ये शेतकऱ्यांची लाखोंची फसवणूक उघड, दोघांवर गुन्हा दाखल**

**बार्शी तालुक्यात निसर्गाचा कोप: श्रीपतपिंपरी येथे वीज पडून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू**

मुख्याध्यापकांची निर्दोष मुक्तता: बार्शी न्यायालयाचा निकाल