**छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत वैरागला १६३१ लाभार्थी समाधानी**

**छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत वैरागला १६३१ लाभार्थी समाधानी**

**KDM NEWS प्रतिनिधी वैराग (जि. सोलापूर):** छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियानांतर्गत महसूल प्रशासनाने आज वैराग येथे समाधान शिबिर आयोजित केले. या शिबिरात विविध विभागांच्या एकूण **१६३१ प्रकरणांचा** निपटारा करण्यात आला.

शिबिरात आधार अद्ययावतीकरण व नवीन आधार कार्ड (३८), कृषी विभागाचे २० दाखले, भूमी अभिलेख विभागाचे २५ उत्तरे वाटप, रेशन कार्ड दुरुस्तीचे १०९ प्रकरणे, आयुष्मान आरोग्य कार्ड (१२०), महिला-बाल विकास विभागाचे ७१ लाभ (३० प्रमाणपत्रे, ११ बेबी किट, ३० PMDVY योजना), पंचायत समितीच्या १० वाळू वाटप पावत्या, नगरपंचायत दाखले (४३), आरोग्य तपासणी (१८३) आणि S.T. लाभ कार्ड (१०) अशा विविध सेवांचा समावेश होता.

याशिवाय सेतु केंद्राद्वारे ४३५ आणि संजय गांधी योजनेच्या २०५ अर्जांचा निपटारा झाला. १९ फेरफार निकाली काढण्यात आले, तर २७ अर्ज स्थगित ठेवण्यात आले. डिजिटल ७/१२ उतारे १६९ आणि डिजिटल ८-अ उतारे १४७ लाभार्थ्यांना वितरित करण्यात आले.

शिबिराचे अध्यक्षस्थानी बार्शी पंचायत समिती उपसभापती **संतोष दादा निंबाळकर** होते. वैराग नगरपंचायत उपनगराध्यक्ष **निरंजन भूमकर**, कृषी उत्पन्न बाजार समिती बार्शीचे उपसभापती **बाबासाहेब गायकवाड**, वैराग नगरपरिषदेचे नगरसेवक, बार्शी तहसीलदार **एफ. आर. शेख**, मुख्याधिकारी **विद्या पाटील**, नायब तहसीलदार **रविंद्र सानप**, निरीक्षण अधिकारी **निलेश आठवले**, उपअधीक्षक भूमी अभिलेख **रेश्मा तांबारे**, दुय्यम निबंधक **संगिता विटकर**, मंडळ अधिकारी **एन. डी. लांडगे** व इतर अधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे उद्घाटन छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलनाने करण्यात आले. प्रस्ताविक तहसीलदार एफ. आर. शेख यांनी केले, सूत्रसंचालन नायब तहसीलदार रविंद्र सानप यांनी केले तर आभार ग्राम महसूल अधिकारी महेश जाधव यांनी मानले.

KDM NEWS प्रतिनिधी 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

**बनावट खतांच्या मोठ्या साठ्यावर कृषी विभागाची धडक कारवाई; सोलापूरमध्ये शेतकऱ्यांची लाखोंची फसवणूक उघड, दोघांवर गुन्हा दाखल**

**बार्शी तालुक्यात निसर्गाचा कोप: श्रीपतपिंपरी येथे वीज पडून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू**

मुख्याध्यापकांची निर्दोष मुक्तता: बार्शी न्यायालयाचा निकाल