**चिखर्डे येथे अवैध दारू विक्रीवर पोलिसांची धडक कारवाई; ८६५५ रुपयांचा मद्यसाठा जप्त**

**चिखर्डे येथे अवैध दारू विक्रीवर पोलिसांची धडक कारवाई; ८६५५ रुपयांचा मद्यसाठा जप्त** 

**KDM NEWS प्रतिनिधी बार्शी (सोलापूर) :** पांगरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत चिखर्डे गावाजवळ हॉटेल राजवाडाच्या मागील बाजूस अवैधरीत्या देशी-विदेशी दारू आणि बियर विक्री करणाऱ्या एका व्यक्तीला पोलिसांनी अटक केली. या कारवाईत विविध ब्रँड्सच्या दारू-बियरच्या बाटल्या असा एकूण ८ हजार ६५५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्या आदेशानुसार निर्भया पोलिस पथक बार्शी-धाराशिव रोडवर पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी प्राप्त झालेल्या विश्वसनीय माहितीवरून पोलिसांनी चिखर्डे येथील हॉटेल राजवाडाच्या मागे धाड टाकली. 

घटनास्थळी पांढऱ्या पिशवीसह बसलेला धनवंत संदीपान कोंढारे (वय ४५, रा. चिखर्डे, ता. बार्शी) हा व्यक्ती आढळून आला. त्याच्या ताब्यातील पिशवीची तपासणी केली असता मास्टर डिलाईट, क्लासिक गोल्ड, किंगफिशर, बडवायझर, टुबर्ग आणि ब्रोकोड कंपनीच्या देशी-विदेशी दारू व बियरच्या बाटल्या आढळल्या. 

पोलिसांनी नमुना तपासणीसाठी प्रत्येक ब्रँडची एक बाटली स्वतंत्रपणे सील करून ताब्यात घेतली. तपासात धनवंत कोंढारे यांच्याकडे दारू विक्रीचा कोणताही वैध परवाना नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार कलम ६५ (ई) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पुढील तपास पांगरी पोलीस ठाणे करत आहे.


KDM NEWS प्रतिनिधी 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

**बनावट खतांच्या मोठ्या साठ्यावर कृषी विभागाची धडक कारवाई; सोलापूरमध्ये शेतकऱ्यांची लाखोंची फसवणूक उघड, दोघांवर गुन्हा दाखल**

**बार्शी तालुक्यात निसर्गाचा कोप: श्रीपतपिंपरी येथे वीज पडून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू**

मुख्याध्यापकांची निर्दोष मुक्तता: बार्शी न्यायालयाचा निकाल