**श्रीपतपिंपरी येथे शेतात लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन २८ वर्षीय तरुणाचा आत्महत्या**
**श्रीपतपिंपरी येथे शेतात लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन २८ वर्षीय तरुणाचा आत्महत्या**
**KDM NEWS प्रतिनिधी बार्शी (सोलापूर):** श्रीपतपिंपरी (ता. बार्शी) येथील एका शेतात लिंबाच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन २८ वर्षीय स्वप्नील नानासाहेब मोरे या तरुणाने आत्महत्या केल्याची घटना दि. ७ मे २०२६ रोजी घडली.
स्वप्नील नानासाहेब मोरे हा श्रीपतपिंपरी येथील शेतकरी नानासाहेब लक्ष्मण मोरे (वय ५५) यांचा मोठा मुलगा होता. नानासाहेब मोरे यांनी बार्शी पोलिस ठाण्यात दिलेल्या खबरी जबाबानुसार, स्वप्नील सकाळी सुमारे १० वाजता नेहमीप्रमाणे शेतात गेला होता. दुपारी २ वाजण्याच्या सुमारास गावचे सरपंच रामराजे ताकभाते यांचा फोन आला आणि स्वप्नीलने शेतात गळफास घेतल्याची माहिती दिली.
कुटुंबातील सदस्य आणि गावकऱ्यांसह नानासाहेब मोरे तातडीने शेती गट क्र. २८९/१ मधील शेतात गेले. तेथे लिंबाच्या झाडाला दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत स्वप्नील आढळला. शाहूराजे घाडगे, रामराजे ताकभाते, अतुल काकडे यांसह उपस्थितांनी दोरी कापून त्याला खाली उतरवले. मात्र, त्याचे शरीर थंड पडले होते आणि तो मयत झाल्याचे स्पष्ट झाले.
स्वप्नील हा आपल्या पत्नी सुनीता, धाकटा भाऊ सुजीत आणि आई-वडिलांसोबत राहत होता. कुटुंब शेती व्यवसायावर अवलंबून होते. आत्महत्येचे कारण अद्याप अज्ञात आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून, शवविच्छेदनानंतर पुढील कारवाई सुरू केली आहे.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या