**तुळजाभवानी मंदिर परिसरातील मंगळसूत्र चोरी टोळीचा पर्दाफाश; चार आरोपी जेरबंद**
**तुळजाभवानी मंदिर परिसरातील मंगळसूत्र चोरी टोळीचा पर्दाफाश; चार आरोपी जेरबंद**
**KDM NEWS प्रतिनिधी धाराशिव :** तुळजाभवानी मंदिरात भाविक महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र आणि सोन्याचे दागिने चोरणाऱ्या टोळीला धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेने मोठ्या कारवाईत अटक केली आहे. या टोळीतील चार आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून ८ लाख ३८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
१ मे २०२६ रोजी तुळजापूर येथील मंदिर परिसरात एका भाविक महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरीला गेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर जिल्ह्यात अशा प्रकारच्या आणखी चोऱ्या समोर आल्याने प्रकरण गांभीर्याने घेण्यात आले. स्थानिक गुन्हे शाखेला तपासाचे आदेश देण्यात आले.
**१५ मे रोजी मोठी कारवाई**
गोपनीय माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वाशी येथील पारगाव टोल नाक्यावर सापळा रचला. यावेळी महिंद्रा स्कॉर्पिओ वाहनासह दोन महिला आणि दोन पुरुष संशयितांना अटक करण्यात आली.
चौकशीत आरोपींनी तुळजापूर आणि येरमाळा परिसरात भाविक महिलांना लक्ष्य करून मंगळसूत्र व सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपींकडून २७ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेले वाहन जप्त केले. या कारवाईमुळे तुळजापूर येथील एक आणि येरमाळा येथील तीन असे एकूण चार चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या