**बार्शीत महिलासुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; महिलेचा विनयभंग; आरोपीसह आईविरोधात गुन्हा दाखल**

**बार्शीत महिलासुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; महिलेचा विनयभंग; आरोपीसह आईविरोधात गुन्हा दाखल** 

**KDM NEWS प्रतिनिधी बार्शी :** शहरातील बाशिंगे प्लॉट परिसरातील एका वाड्यात एका महिलेचा विनयभंग करण्यात आल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी आरोपी सदानंद उर्फ गोट्या पिंगळे व त्याची आई सविता पिंगळे यांच्याविरुद्ध बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी महिला आपल्या आई, मुलगी व बहिणीसोबत बाशिंगे प्लॉट येथील वाड्यात राहते. ती मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करते. गेल्या काही दिवसांपासून उष्णतेमुळे परिसरातील महिला लाईटच्या उजेडात वाड्यात झोपत होत्या.

शुक्रवार, २२ मे २०२६ रोजी पहाटे साडेतीन वाजता झोपेत असलेल्या फिर्यादी महिलेला आपली प्लाझो पॅन्ट कोणीतरी ओढल्याचे जाणवले. जाग आल्यावर तिने पाहिले की, ओळखीचा सदानंद उर्फ गोट्या पिंगळे याने तिच्या कपड्यांमध्ये हात घालून छातीवर हात फिरवला. घाबरलेल्या महिलेनं मोठ्याने आरडाओरडा केला.

आरडाओरड्याने जाग्या झालेल्या फिर्यादीच्या बहिणीने आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र तो घटनास्थळावरून पळून गेला. त्यानंतर आरोपीची आई सविता पिंगळे यांनी फिर्यादी व तिच्या बहिणीला शिवीगाळ केली. तसेच “माहेरच्या लोकांना बोलावून गंभीर परिणाम भोगावे लागतील,” अशी धमकी दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

फिर्यादी महिलेने डायल ११२ वरून पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तिची तक्रार दाखल केली. या प्रकरणी आरोपी सदानंद उर्फ गोट्या पिंगळे व सविता पिंगळे यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ७४, ३५१(२)(३), ३५२, ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास पोलीस नाईक अडसुळ करत आहेत.

KDM NEWS प्रतिनिधी 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

**बनावट खतांच्या मोठ्या साठ्यावर कृषी विभागाची धडक कारवाई; सोलापूरमध्ये शेतकऱ्यांची लाखोंची फसवणूक उघड, दोघांवर गुन्हा दाखल**

**बार्शी तालुक्यात निसर्गाचा कोप: श्रीपतपिंपरी येथे वीज पडून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू**

मुख्याध्यापकांची निर्दोष मुक्तता: बार्शी न्यायालयाचा निकाल