**एचडीएफसी बँकेच्या ATM मध्ये‘चिल्ड्रन बँक’च्या ५० हजार रुपयांच्या बनावट नोटा**

**एचडीएफसी बँकेच्या ATM मध्ये‘चिल्ड्रन बँक’च्या ५० हजार रुपयांच्या बनावट नोटा** 

**KDM NEWS प्रतिनिधी धुळे :** धुळे शहरातील एचडीएफसी बँकेच्या मुख्य शाखेबाहेरील कॅश डिपॉझिट मशीन (सीडीएम) मध्ये ‘चिल्ड्रन बँक ऑफ इंडिया’च्या ५०० रुपयांच्या १०० बनावट नोटा जमा केल्याप्रकरणी अहिल्यानगर जिल्ह्यातील एका २४ वर्षीय तरुणावर आझादनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकारामुळे बँकिंग सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

९ मे २०२६ रोजी सकाळी सुमारे ९.५६ वाजता गल्ली क्रमांक ६ येथील एचडीएफसी बँक शाखेबाहेरील यंत्रात आरोपीने स्वतःच्या खात्यात बनावट नोटा जमा केल्या. या नोटांवर ‘चिल्ड्रन बँक ऑफ इंडिया’, ‘भारतीय बच्चो का बैंक पाँच सौ’ आणि ‘गॅरंटीड बाय चिल्ड्रन बँक’ असा मजकूर छापलेला होता. सर्व नोटांवर “३ सीबी ००००००” असा एकच क्रमांक होता. नोटांचा रंग, आकार व महात्मा गांधींचे चित्र खऱ्या नोटांसारखे दिसत होते.

बँकेच्या प्रगत यंत्रणेमुळे संशयास्पद नोटा वेगळ्या सुरक्षित बॉक्समध्ये पडल्या. बँकेचे सहाय्यक प्रबंधक मयूर पुंडलिक पाटील यांनी आझादनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. सीसीटीव्ही फुटेज व एटीएम कार्ड माहितीवरून आरोपीची ओळख पटवण्यात आली.

**आरोपी :** सचिन संभाजी पिसोटे (वय २४, रा. सुसारे, ता. अहिल्यानगर)

पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८(२), १७९ व १८० अन्वये गुन्हा (क्र. ८०/२०२६) दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक महेश घायतड करत आहेत.

या घटनेमुळे रोख जमा यंत्रणांतील बनावट नोटा ओळखण्याच्या यंत्रणेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. नोटांवर स्पष्टपणे ‘चिल्ड्रन बँक’ असा उल्लेख असतानाही त्या स्वीकारल्या गेल्याने बँक प्रशासन व सुरक्षा यंत्रणेची दक्षता वाढविण्याची गरज निर्माण झाली आहे. पोलिसांनी पुरवठादारांचाही शोध सुरू केला आहे.

KDM NEWS प्रतिनिधी 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

**बनावट खतांच्या मोठ्या साठ्यावर कृषी विभागाची धडक कारवाई; सोलापूरमध्ये शेतकऱ्यांची लाखोंची फसवणूक उघड, दोघांवर गुन्हा दाखल**

**बार्शी तालुक्यात निसर्गाचा कोप: श्रीपतपिंपरी येथे वीज पडून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू**

मुख्याध्यापकांची निर्दोष मुक्तता: बार्शी न्यायालयाचा निकाल