**"इंधन संकटाची चाहूल! शाळा-कार्यालये पुन्हा 'ऑनलाइन' होणार? मोदींचे देशाला मोठे आवाहन"**
**"इंधन संकटाची चाहूल! शाळा-कार्यालये पुन्हा 'ऑनलाइन' होणार? मोदींचे देशाला मोठे आवाहन"**
**KDM NEWS प्रतिनिधी नवी दिल्ली, ११ मे २०२६** – जागतिक पातळीवर इंधनाच्या किंमती आकाशाला भिडत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशवासीयांना पुन्हा एकदा सावधगिरीचा आणि काटकसरीचा संदेश दिला आहे. कोरोनाकाळातील ‘वर्क फ्रॉम होम’ आणि ऑनलाइन शिक्षण पद्धतींना पुन्हा प्राधान्य देण्याचे स्पष्ट आवाहन त्यांनी केले आहे.
पंतप्रधान मोदींनी हैदराबाद येथील एका कार्यक्रमात बोलताना म्हटले, “कोरोनाकाळात आपण ज्या तंत्रज्ञानाचा आणि पद्धतींचा वापर केला, त्याची आता पुन्हा गरज निर्माण झाली आहे. शक्य तेव्हा घरी बसून काम करा, शाळा-महाविद्यालये ऑनलाइन वर्ग घ्या, अनावश्यक प्रवास टाळा. हे केवळ आपल्या खिशाचे नाही, तर देशाचे रक्षण आहे.”
**मोदींचे मुख्य आवाहन**
- शाळा आणि महाविद्यालयांना ऑनलाइन क्लासेसना प्राधान्य द्या
- कंपन्यांनी वर्क फ्रॉम होम मॉडेल राबवा
- अनावश्यक वाहन वापर आणि परदेशी प्रवास कमी करा
- पेट्रोल-डिझेल, गॅस यांच्या वापरात काटकसर करा
- सार्वजनिक वाहतुकीचा (मेट्रो, बस, कारपूलिंग) अधिक वापर करा
पश्चिम आशियातील वाढत्या तणावामुळे जागतिक कच्च्या तेलाच्या पुरवठ्यात अडथळे निर्माण झाले असून, त्याचा परिणाम भारतावरही होत आहे. यामुळे पेट्रोल-डिझेल, रसोई गॅस आणि इतर वस्तूंच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी ‘राष्ट्रहित’ डोळ्यासमोर ठेवून हे पाऊल उचलल्याचे मानले जात आहे.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या