**अक्कलकोट : नितीन गडकरी यांनी टेंभुर्णी-कुर्डूवाडी-बार्शी-लातूर चौपदरीकरणास लवकर मान्यता देण्याचे आश्वासन**
**अक्कलकोट : नितीन गडकरी यांनी टेंभुर्णी-कुर्डूवाडी-बार्शी-लातूर चौपदरीकरणास लवकर मान्यता देण्याचे आश्वासन**
**KDM NEWS प्रतिनिधी अक्कलकोट (सोलापूर) :** विविध विकास कामांच्या उद्घाटन समारंभासाठी आज अक्कलकोट येथे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी सोलापूर जिल्ह्यातील महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला चालना मिळाली.
मा. आमदार राजेंद्र राऊत यांनी समारंभात गडकरी यांच्याकडे **टेंभुर्णी - कुर्डूवाडी - बार्शी - लातूर** या मार्गाच्या चौपदरीकरणासाठी DRP (Detailed Road Project) ला तात्काळ मान्यता देऊन प्रशासकीय मंजुरी देण्याची मागणी केली. या रस्त्यामुळे सोलापूर, धाराशिव आणि लातूर या तीन जिल्ह्यांना मोठा विकासाचा फायदा होणार आहे.
नितीन गडकरी यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत, “या रस्त्याच्या कामाला लवकरात लवकर प्रशासकीय मान्यता देऊन निधी उपलब्ध करून प्रत्यक्ष कामास सुरुवात केली जाईल,” असे स्पष्ट आश्वासन दिले.
समारंभात आमदार सचिन दादा कल्याणशेट्टी, आमदार सुभाष बापू देशमुख, विजयकुमार देशमुख, आमदार देवेंद्र कोठे, आमदार समाधान आवताडे, आमदार रामभाऊ सातपुते, जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य, शहाजी पवार, सोलापूर शहराध्यक्षा रोहिणीताई तडवळकर यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.
या चौपदरी रस्त्याच्या कामामुळे परिसरातील वाहतूक सुधारणा होणार असून, आर्थिक आणि औद्योगिक विकासाला चालना मिळणार आहे.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या