**बार्शीत ७५० लिटर अवैध हातभट्टी दारूचा सुळसुळाट! टेम्पोसह चालक अटक**
**बार्शीत ७५० लिटर अवैध हातभट्टी दारूचा सुळसुळाट! टेम्पोसह चालक अटक**
**KDM NEWS बार्शी (प्रतिनिधी) :** बार्शी तालुका पोलीस ठाण्याच्या पथकाने मंगळवारी (१९ मे २०२६) रात्री ११ वाजता फपाळवाडी शिवारात (बार्शी-शेलगाव रोड) सापळा लावून एका टेम्पोमधून ७५० लिटर अवैध हातभट्टी दारू जप्त केली. टेम्पोसह एकूण सुमारे ४.५० लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
गोपनीय बातमीवरून पोलीस उपनिरीक्षक बालाजी पळसने यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक माने व पथकातील कर्मचारी राहुल र्बोदर यांनी रोडवरील गतिरोधकावर वाहन तपासणी सुरू केली होती. यावेळी राखाडी रंगाचा अशोक लिलँड टेम्पो क्र. MH-13-DQ-4813 आढळला. तपासणी केली असता मागील हौद्यात १५ काळ्या रबर ट्यूबांमध्ये भरण्यात आलेली ७५० लिटर (प्रत्येक ट्यूब ५० लिटर) हातभट्टी दारू सापडली. दारूचा तीव्र आंबट वास येत होता.
टेम्पो चालक अविनाश प्रकाश पवार (वय २७, रा. तांबेवाडी, यमाई तांडा, ता. बार्शी, जि. सोलापूर) याला ताब्यात घेण्यात आले. पंचांसमक्ष टेम्पोची तपासणी करून दारू व वाहन जप्त करण्यात आले.
**जप्त मुद्देमाल :**
- हातभट्टी दारू : ७५० लिटर (१५ रबर ट्यूबा)
- टेम्पो : अशोक लिलँड, MH 13 DQ 4813
या प्रकरणी बार्शी तालुका पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५(अ) व ६५(ई) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीविरुद्ध पुढील तपास सुरू आहे.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या