**सोलापूर कृषी बाजार समितीत कांद्याचे भाव कोसळले; १,२८७ किलो विकूनही शेतकऱ्याला ३०१ रुपये तोटा**

**सोलापूर कृषी बाजार समितीत कांद्याचे भाव कोसळले; १,२८७ किलो विकूनही शेतकऱ्याला ३०१ रुपये तोटा** 

**KDM NEWS प्रतिनिधी सोलापूर:** सोलापूर जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांची दैना होत आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. एका शेतकऱ्याने १,२८७ किलो कांदा विक्रीस आणला, मात्र वाहतूक, हमाली, तोलाई आणि इतर खर्च वजा जाता उलट ३०१ रुपये स्वतःच्या खिशातून द्यावे लागले.

शशिराव तोदेकर (मंगळवेढा तालुका) यांनी १,२८७ किलो कांदा बाजारात आणला. त्याला केवळ १,४६८ रुपये मिळाले. हमाली, तोलाई आणि वाहनभाडे मिळून एकूण १,७६९ रुपये खर्च आला. परिणामी शेतकऱ्याला ३०१ रुपये तोटा सोसावा लागला. हा प्रकार सामान्य झाला आहे.

सोलापूर बाजारात सध्या कांद्याचे दर प्रति किलो १ ते ८ रुपये एवढेच फिरत आहेत. काही ठिकाणी ५० पैशांपर्यंत घसरले आहेत. मोठ्या प्रमाणात कांदा आगमन, निर्यात मंदावणे आणि साठवणुकीतील नुकसान यामुळे दर कोसळले आहेत. शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च प्रति किलो १८ ते २० रुपये एवढा असताना मिळणारा भाव त्यापेक्षा कितीतरी कमी आहे.

शेतकरी संघटनांनी सरकारला तातडीने कांद्याला हमीभाव जाहीर करण्याची आणि नाफेडमार्फत खरेदी करण्याची मागणी केली आहे. अनेक शेतकरी कांदा विक्री करून घरी रिकाम्या हातांनी परतत आहेत. काहींनी कांदा जाळून टाकण्याची घटनाही समोर आल्या आहेत.

सोलापूरसह नाशिक, अहिल्यानगर महाराष्ट्रातील प्रमुख कांदा उत्पादक जिल्ह्यांत ही समस्या गंभीर बनली आहे. शेतकऱ्यांच्या मते, मध्यस्थांचा फायदा आणि निर्यातीतील अडथळे यामुळे हा संकट निर्माण झाले आहे.

KDM NEWS प्रतिनिधी 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

**बनावट खतांच्या मोठ्या साठ्यावर कृषी विभागाची धडक कारवाई; सोलापूरमध्ये शेतकऱ्यांची लाखोंची फसवणूक उघड, दोघांवर गुन्हा दाखल**

**बार्शी तालुक्यात निसर्गाचा कोप: श्रीपतपिंपरी येथे वीज पडून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू**

मुख्याध्यापकांची निर्दोष मुक्तता: बार्शी न्यायालयाचा निकाल