**इंटरनेट फार्मसीविरोधात बार्शीत औषध विक्रेत्यांचा एकदिवसीय बंद**
**इंटरनेट फार्मसीविरोधात बार्शीत औषध विक्रेत्यांचा एकदिवसीय बंद**
**KDM NEWS प्रतिनिधी बार्शी : अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटनेच्या (AIOCD) आवाहनानुसार आज बुधवार, दि. २० मे २०२६ रोजी बार्शी तालुक्यातील सर्व मेडिकल दुकाने बंद आहेत. इंटरनेट फार्मसीच्या अनधिकृत ऑनलाइन औषध विक्रीविरोधात हा एकदिवसीय संप सुरू आहे.
बार्शी शहरासह संपूर्ण तालुक्यात सकाळपासून औषध विक्रेते बंद आंदोलनात सहभागी झाले असून, बहुतेक सर्व मेडिकल दुकाने पूर्णपणे बंद दिसत आहेत. सोलापूर जिल्हा केमिस्ट्स अँड ड्रगिस्ट्स असोसिएशनने यापूर्वीच प्रशासनाला सूचित केले होते.
**इमर्जन्सी सेवेसाठी उपलब्ध मेडिकल्स**
अत्यावश्यक रुग्णांच्या सोयीसाठी खालील हॉस्पिटलमधील मेडिकल्स चालू ठेवण्यात आले आहेत:
1. डॉ. जगदाळे मामा हॉस्पिटल मेडिकल - ७०२०२५१५५३
2. सुविधा हॉस्पिटल मेडिकल - ९९७०७६५३३०
3. महालक्ष्मी मेडिकल, डॉ. अंधारे हॉस्पिटल - ९४२०७५४००३
4. श्री समर्थ मेडिकल, डॉ. पडवळ हॉस्पिटल - ९३७२१४०५८६
5. प्रगती मेडिकल, डॉ. सोमानी हॉस्पिटल - ९९२१०५१५०४
6. शिवाई मेडिकल, वैराग - ९६६५३३३३८८
**इमर्जन्सी संपर्क क्रमांक**
- सुधीर सुरेश राऊत (रिद्धी सिद्धी मेडिकल्स) - ८२०८३८७१७७
- प्रशांत कपिलेश्वर बारस्कर - ७२७६७४७३७४
- सुवर्णा मेडिकल, कसबा पेठ - ९८९०९५८२८५
- जयंत साळवे (श्याम मेडिकल, वैराग) - ९४२३३३६२४६
जिल्हा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, संप शांततेत सुरू असून, इमर्जन्सी रुग्णांसाठी सर्व सहकार्य करण्यात येईल. आजचा बंद पूर्णपणे यशस्वी झाल्याचे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले आहे.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या