**तुकाराम मुंढे यांची अन्न व औषध प्रशासन मुंबईच्या आयुक्तपदी नियुक्ती**
**तुकाराम मुंढे यांची अन्न व औषध प्रशासन मुंबईच्या आयुक्तपदी नियुक्ती**
**KDM NEWS प्रतिनिधी मुंबई, १९ मे २०२६:** महाराष्ट्र शासनाने आज तुकाराम मुंढे, भाप्रसे यांची अन्न व औषध प्रशासन, मुंबई या पदावर आयुक्त म्हणून बदली केली आहे. श्री. श्रीधर डुबे यांच्या जागी ही नियुक्ती करण्यात आली असून, पद अधिकालिक वेतन श्रेणीत उन्नत करून देण्यात आले आहे.
सामान्य प्रशासन विभागाने काढलेल्या आदेशानुसार मुंढे यांनी त्वरित नवीन पदाचा कार्यभार स्वीकारावा, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.
बदली आदेशात रुजू अहवाल SAPREMO प्रणालीवर अपडेट करण्यासह, कार्यभार हस्तांतरण, गोपनीय अहवाल लिहिणे, ई-ऑफिस आणि एचआरएमएस प्रणालीचा अधिकाधिक वापर यासारख्या महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
तुकाराम मुंढे हे भाप्रसे संवर्गातील अनुभवी अधिकारी आहेत. अन्न व औषध प्रशासन हा अत्यंत महत्त्वाचा नियामक विभाग असल्याने ही बदली प्रशासनिक वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे.
टिप्पण्या