**बार्शीत मोटारसायकल ‘कट’च्या वादातून हिंसक मारहाण; दोन तरुण जखमी**

**बार्शीत मोटारसायकल ‘कट’च्या वादातून हिंसक मारहाण; दोन तरुण जखमी** 

**KDM NEWS बार्शी (प्रतिनिधी):** किरकोळ वादातून बार्शी शहरात पुन्हा एकदा तरुणांमधील हिंसाचार समोर आला आहे. मोटारसायकलला कट मारल्याच्या आरोपावरून तिघांनी दोन तरुणांना रस्त्यात अडवून दगडाने मारहाण केल्याची घटना मलिक चौकात घडली. या प्रकरणी बार्शी शहर पोलिसांत तिन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

१५ मे रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली. उबेद शहानवाज तांबोळी (१८, रा. बार्शी) व त्याचा मित्र साईम शाहीद सय्यद हे क्षीरसागर टर्फ येथे क्रिकेट खेळून इलेक्ट्रिक दुचाकीवर घरी परतत होते. परांडा रोडवरील मलिक चौकातील अजिंठा कलेक्शनसमोर त्यांना रेहान बाबुडे, यासिर तुटके व शोएब मिर्झा यांनी अडवले.

आरोपींनी “तू आम्हाला कट का मारलास?” असा प्रश्न विचारत शिवीगाळ सुरू केली. त्यानंतर त्यांनी दोघांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. वाद अधिक तीव्र झाल्यावर आरोपींनी दगड फेकले. यात उबेद तांबोळीच्या पाठीवर तर साईम सय्यदच्या बरगडीवर दगड लागल्याने दोघे जखमी झाले. आरोपींनी जीवे मारण्याची धमकीही दिल्याची फिर्यादीत नोंद आहे.

परिसरातील नागरिकांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठी घटना टळली. जखमी तरुणांनी प्रथम ग्रामीण रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर बार्शी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. उबेद तांबोळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तिघांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पोलिसांकडून याबाबत पुढील तपास हेड कॉन्स्टेबल भोसले करत आहेत.


KDM NEWS प्रतिनिधी 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

**बनावट खतांच्या मोठ्या साठ्यावर कृषी विभागाची धडक कारवाई; सोलापूरमध्ये शेतकऱ्यांची लाखोंची फसवणूक उघड, दोघांवर गुन्हा दाखल**

**बार्शी तालुक्यात निसर्गाचा कोप: श्रीपतपिंपरी येथे वीज पडून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू**

मुख्याध्यापकांची निर्दोष मुक्तता: बार्शी न्यायालयाचा निकाल