**अपघातानंतर रोष वाढला,बार्शी-येरमाळा रस्त्यावर रास्ता रोको; मनाई आदेशाचा भंग**
**अपघातानंतर रोष वाढला,बार्शी-येरमाळा रस्त्यावर रास्ता रोको; मनाई आदेशाचा भंग**
**KDM NEWS प्रतिनिधी बार्शी**पिंपळवाडी (ता. बार्शी) येथे महिलेच्या अपघाती मृत्यूनंतर गतिरोधकाची मागणी करणाऱ्या ग्रामस्थांनी मंगळवारी (१९ मे २०२६) सकाळी बार्शी-येरमाळा मुख्य रस्त्यावर बस स्टॉपजवळ रास्ता रोको आंदोलन केले. जिल्हाधिकाऱ्यांच्या मनाई आदेशाचा भंग करून आंदोलकांनी वाहतूक अडवली.
पांगरी पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पो.कॉ. जिंदास महारुद्र काकडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, १८ मे रोजी रात्री साडेआठच्या सुमारास पिंपळवाडी येथील अयोध्या शिवराज चौधरी (वय ३४) ही रस्ता ओलांडत असताना मोटारसायकलने धडक दिली. तिला उपचारासाठी जगदाळे मामा हॉस्पिटलमध्ये नेले असता ती मयत घोषित करण्यात आली.
या घटनेच्या निष्प्रभतेसाठी ग्रामस्थांनी १९ मे रोजी सकाळी १०.३० ते १२.०० वाजेदरम्यान बस स्टॉप चौकात रस्ता अडवला. आंदोलकांनी गतिरोधकाची मागणी करत जोरदार घोषणाबाजी केली. पोलिसांनी मनाई आदेशाची माहिती देऊन शांततेने आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. मात्र, आंदोलकांनी नोटीस स्वीकारण्यास नकार दिला.
जिल्हाधिकारी कार्यालयाने ११ मे २०२६ रोजी दिलेल्या आदेशानुसार १३ मे ते २७ मे २०२६ पर्यंत सीआरपीसी कलम ३७(१)अ ते फ व ३७(३) अंतर्गत मनाई आदेश लागू आहे. या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी पांगरी पोलिसांनी रवीकांत चौधरी व इतरांविरुद्ध बीएनएस कलम १८९(२), १८९(३), २२३, १२६(२) व महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम १३५ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी तहसीलदार व एमएसआरडीसी अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलावले होते. आंदोलनकर्ते सुमारे दीड तास रस्ता रोको करून नंतर निघून गेले.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या