**सरपंच द पॉवर मॅन चित्रपटाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गौरव; 'टायटल लय पॉवरफुल आहे'**
**सरपंच द पॉवर मॅन चित्रपटाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गौरव; 'टायटल लय पॉवरफुल आहे'**
**KDM NEWS प्रतिनिधी मुंबई:** महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठी चित्रपट 'सरपंच द पॉवर मॅन' च्या टीमचे मुंबईतील नंदनवन निवासस्थानी स्वागत केले. त्यांनी चित्रपटाचे पोस्टर व ट्रेलर पाहून कौतुक व्यक्त केले आणि टायटल अतिशय पॉवरफुल असल्याचे मत व्यक्त केले.
उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “सरपंच द पॉवर मॅन चित्रपटाचे टायटल लय पॉवरफुल आहे. हा चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीत धमाका करणार आहे.” त्यांनी मुख्य अभिनेता व दिग्दर्शक महादेव जाधवर यांच्यासह इतर कलाकारांच्या अभिनयाचे देखील विशेष कौतुक केले.
शिंदे यांनी सरपंच पदाच्या महत्त्वावर प्रकाश टाकला. ते म्हणाले, “सरपंच हा तळागाळातील गावखेड्यातील सर्वात महत्वाची पॉवर आहे. गावाचा विकास करणे, गावाला सर्व सोयींनी सुसज्ज करणे यासाठी सरपंच हे अत्यंत महत्वाचे पद आहे.” त्यांनी चित्रपटाच्या टीमला शुभेच्छा दिल्या.
या भेटीत मुख्य अभिनेते व दिग्दर्शक महादेव जाधवर, मुंबई सरकारी वकील ॲड. अविनाश जाधव, कार्यकारी निर्माते राजेंद्र वाघमारे व इतर टीम सदस्य उपस्थित होते. चित्रपट १५ मे २०२६ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
'सरपंच द पॉवर मॅन' हा मराठी अॅक्शन चित्रपट ग्रामीण भागातील सरपंचाच्या संघर्ष आणि गावाच्या विकासावर आधारित आहे. महादेव जाधवर यांच्या दिग्दर्शनाखालील या चित्रपटाने ट्रेलर आणि पोस्टरमुळे प्रेक्षकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या