**सोलापूर : १.९० कोटींच्या एमडी ड्रग्ज प्रकरणात रिजवान खानला न्यायालयीन कोठडी, साहिल पीरजादेला दोन दिवसांची वाढीव पोलीस कोठडी**

**सोलापूर : १.९० कोटींच्या एमडी ड्रग्ज प्रकरणात रिजवान खानला न्यायालयीन कोठडी, साहिल पीरजादेला दोन दिवसांची वाढीव पोलीस कोठडी** 

**KDM NEWS प्रतिनिधी सोलापूर :** मोदी कब्रस्थान परिसरात ९५० ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) अमली पदार्थ जप्त करण्यात आलेल्या प्रकरणात मुख्य आरोपी रिजवान शब्बीर खान याला विशेष न्यायाधीश श्री. सुरवसे यांनी न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तर साहिल सिकंदर पीरजादे यास आणखी दोन दिवसांची वाढीव पोलीस कोठडी देण्यात आली.

या कारवाईत शहर गुन्हे शाखेच्या पथकाने ९५० ग्रॅम एमडीसह १० लाख रुपये किंमतीची हुंडाई क्रेटा कार जप्त केली. एकूण २ कोटी रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. प्रकरणातील एका महिलेसह अफजल मुर्शीद या आणखी एका आरोपीचा शोध घेण्यात येत आहे.

**१२ मे रोजी छापा :** १२ मे रोजी गोपनीय माहितीवरून मुस्लिम कब्रस्तान ते संगमेश्वर कॉलेज मार्गावर उभी असलेल्या हुंडाई क्रेटा कारची झडती घेण्यात आली. वाहनाच्या ड्रॉवरमध्ये प्लास्टिक पिशवीत ठेवलेला पांढऱ्या स्फटिक स्वरूपातील ९५० ग्रॅम मेफेड्रोन आढळून आला.

चौकशीदरम्यान रिजवान खान याने हा ड्रग्जचा साठा साहिल सिकंदर पीरजादे आणि अफजल मुर्शीद यांच्याकडून मिळाल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी दोघांना अटक केली होती.

पोलीस कोठडीची मुदत संपल्याने दोन्ही आरोपींना शुक्रवारी विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायाधीशांनी रिजवान खान याला न्यायालयीन कोठडी तर साहिल पीरजादे याला दोन दिवसांची वाढीव पोलीस कोठडी दिली.

आरोपींच्या वतीने ॲड. शैलेश पोटफोडे तर सरकार पक्षातर्फे ॲड. दत्तूसिंह पवार यांनी काम पाहिले.
या प्रकरणाची अधिक तपासणी शहर गुन्हे शाखा करत आहे.

KDM NEWS प्रतिनिधी 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

**बनावट खतांच्या मोठ्या साठ्यावर कृषी विभागाची धडक कारवाई; सोलापूरमध्ये शेतकऱ्यांची लाखोंची फसवणूक उघड, दोघांवर गुन्हा दाखल**

**बार्शी तालुक्यात निसर्गाचा कोप: श्रीपतपिंपरी येथे वीज पडून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू**

मुख्याध्यापकांची निर्दोष मुक्तता: बार्शी न्यायालयाचा निकाल