**लातूर पॅटर्नचा फुगा फुटला; नीट पेपर फुटीत CBI ने रिटायर्ड प्रोफेसरला अटक**
**लातूर पॅटर्नचा फुगा फुटला; नीट पेपर फुटीत CBI ने रिटायर्ड प्रोफेसरला अटक**
**KDM NEWS प्रतिनिधी लातूर, १५ मे २०२६: नीट-यूजी २०२६ परीक्षेच्या कथित पेपर फुटी प्रकरणात महाराष्ट्रातील शिक्षण नगरी लातूरचे नाव जोरदार चर्चेत आले आहे. सीबीआयने गुरुवारी लातूरमध्ये छापे टाकून एका रिटायर्ड प्रोफेसरला ताब्यात घेतले. याचबरोबर रेनुकाई केमिस्ट्री क्लासेस (आरसीसी) चे संचालक शिवराज मोतेगावकर यांची देखील चौकशी सुरू केली आहे.
पालकांच्या तक्रारीनुसार, परीक्षेच्या एक दिवस आधी लातूरमधील एका नामांकित कोचिंग क्लासने विद्यार्थ्यांना दिलेल्या मॉक टेस्टमध्ये केमिस्ट्रीच्या ४५ पैकी ४२ प्रश्न नीट परीक्षेत जसेच्या तसे आले. या तक्रारीनंतर लातूर पोलिसांनी प्राथमिक चौकशी सुरू केली होती. आता सीबीआयने ही प्रकरण हातात घेतल्याने तपास अधिक गहन झाला आहे.
सीबीआयच्या माहितीनुसार, लातूरमधील रिटायर्ड प्रोफेसर पी.व्ही. कुलकर्णी यांना पेपर सेटिंगशी संबंधित संशयित म्हणून ताब्यात घेण्यात आले. त्यांनी पूर्वी नीट पेपर सेटिंग समितीवर काम केले होते. सीबीआयचे २८ सदस्यांचे पथक सध्या लातूरमध्ये मुक्काम करून तपास करत आहे. मोतेगावकर यांच्या निवासस्थानी सीबीआयने गुरुवारी रात्री आणि शुक्रवारी सकाळी भेट घेऊन माहिती घेतली.
**पेपर फोडला तर किती कोटीला?**
अद्याप पेपर सेट करणाऱ्यांनीच विकल्याचे किंवा कोणत्या रकमेत विकल्याचे अधिकृत पुरावे समोर आलेले नाहीत. मात्र, इतर राज्यांमध्ये (राजस्थान, नाशिक) पेपर लाखो रुपयांना विकल्याचे आरोप आहेत. लातूरमधील 'लातूर पॅटर्न' ज्याने अनेक विद्यार्थ्यांना वैद्यकीय व अभियांत्रिकी क्षेत्रात यश मिळवून दिले, त्याच पॅटर्नवर आता गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
नीट परीक्षा रद्द झाल्याने सुमारे २३ लाख विद्यार्थ्यांच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सीबीआय तपासात लातूर, नाशिक, पुणे आणि राजस्थान येथील कोचिंग सेंटर व प्रोफेसर यांचे नेटवर्क उघड होण्याची शक्यता आहे.
तपास सुरू असल्याने अधिक माहिती समोर येत असताना, लातूर पोलिस आणि सीबीआय दोन्ही यंत्रणा समन्वयाने काम करत आहेत. या प्रकरणात आणखी अटक आणि छापे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या