**सोलापूर प्रशासनात ‘पती-पत्नी’ राज; IAS कुशल जैन ZP CEO, IPS वृष्टी जैन DCP**
**सोलापूर प्रशासनात ‘पती-पत्नी’ राज; IAS कुशल जैन ZP CEO, IPS वृष्टी जैन DCP**
**KDM NEWS प्रतिनिधी सोलापूर:** सोलापूर जिल्ह्यात प्रशासन आणि कायदा-सुव्यवस्थेची प्रमुख जबाबदारी एकाच IAS-IPS दांपत्याकडे आली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) कुशल जैन (IAS) आणि शहर पोलीस उपायुक्त वृष्टी जैन (IPS) ही पती-पत्नी जोडी जिल्ह्याच्या विकास आणि सुरक्षा व्यवस्थेकडे पाहत आहे.
कुशल जैन (IAS २०२२ बॅच, महाराष्ट्र कॅडर) यांनी एप्रिल २०२६ मध्ये सोलापूर जिल्हा परिषदेचा CEO पदभार स्वीकारला. गडचिरोलीत उपविभागीय अधिकारी म्हणून काम केल्यानंतर ते सोलापूरमध्ये आले आहेत. ग्रामीण विकास, पाणीपुरवठा, शासकीय योजनांची अंमलबजावणी आणि प्रशासकीय सुधारणा यांना ते प्राधान्य देत आहेत.
वृष्टी जैन (IPS २०२२ बॅच) नागपूरहून सोलापूर शहर पोलीस उपायुक्त (DCP) म्हणून नुकत्याच रुजू झाल्या आहेत. शहरातील कायदा-सुव्यवस्था, गुन्हेगारी नियंत्रण आणि महिला सुरक्षा या क्षेत्रांत त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत.
**दुर्मिळ योग**
एकाच जिल्ह्यात पती ग्रामीण प्रशासन तर पत्नी शहर पोलीस दलाची धुरा सांभाळत असल्याने सोलापूर प्रशासनात हा योग दुर्मिळ मानला जात आहे. दोघेही २०२२ च्या UPSC बॅचचे अधिकारी असून, विवाहानंतर महाराष्ट्र कॅडरमध्ये एकत्र आले आहेत.
प्रशासकीय वर्तुळात या दांपत्याकडे कौतुकाने पाहिले जात आहे. जिल्ह्यात विकास कामे वेगाने होणे आणि सुरक्षितता मजबूत होणे यासाठी हा बदल फायदेशीर ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या