**राज्यात पोलिस दलात मोठे बदल; नाशिकचे वादग्रस्त IG दत्ता कराळे यांच्यासह २४ बड्या IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या**

**राज्यात पोलिस दलात मोठे बदल; नाशिकचे वादग्रस्त IG दत्ता कराळे यांच्यासह २४ बड्या IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या** 

**KDM NEWS प्रतिनिधी पुणे/मुंबई:** महाराष्ट्र सरकारने आज पोलीस प्रशासनात मोठा फेरबदल केला असून २४ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. यात नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक (IG) दत्ता कराळे यांचा समावेश असून त्यांची राज्य मानवी हक्क आयोगात बदली करण्यात आली आहे.

दत्ता कराळे यांच्यावर अलीकडेच अशोक खरात प्रकरणातून वाद निर्माण झाला होता. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी त्यांच्यावर खरात यांच्या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आरोप केले होते. या पार्श्वभूमीवर त्यांची बदली महत्त्वाची मानली जात आहे. त्यांच्या जागी विशेष पोलीस महानिरीक्षक प्रशिक्षण प्रविण पडवळ यांची नाशिक परिक्षेत्रात नियुक्ती करण्यात आली आहे.

**इतर प्रमुख बदल्या:**

- कृष्ण प्रकाश - अपर पोलीस महासंचालक, फोर्स वन → अपर पोलीस महासंचालक (प्रशिक्षण)
- लखमी गौतम - पोलीस सह आयुक्त (गुन्हे), मुंबई → विशेष पोलीस महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था)
- मनोज शर्मा - विशेष पोलीस महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था) → पोलीस सह आयुक्त (कायदा व सुव्यवस्था), मुंबई
- सी.के. मीना - विशेष पोलीस महानिरीक्षक, ATS → विशेष पोलीस महानिरीक्षक, कोकण परिक्षेत्र
- ज्योतिप्रिया सिंह - अंमली पदार्थ विरोधी पथकाची प्रमुख (पदोन्नतीने)
- दिपक साकोरे - नवी मुंबईचे सह पोलीस आयुक्त (पदोन्नतीने)

या बदल्या गृह विभागाने जारी केल्या असून त्यात अपर पोलीस महासंचालक, विशेष IG, सह आयुक्त आणि अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. बदल्यांमुळे मुंबई, पुणे, ठाणे, नाशिकसह विविध परिक्षेत्रांतील पोलीस यंत्रणेत प्रशासकीय बदल होतील.

सरकारने या बदल्या प्रशासकीय गरजेनुसार आणि कार्यक्षमता वाढविण्यासाठी केल्याचे सांगितले आहे. अधिकाऱ्यांना लवकरात लवकर नव्या पदस्थानी रुजू होण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

KDM NEWS प्रतिनिधी 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

**बनावट खतांच्या मोठ्या साठ्यावर कृषी विभागाची धडक कारवाई; सोलापूरमध्ये शेतकऱ्यांची लाखोंची फसवणूक उघड, दोघांवर गुन्हा दाखल**

**बार्शी तालुक्यात निसर्गाचा कोप: श्रीपतपिंपरी येथे वीज पडून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू**

मुख्याध्यापकांची निर्दोष मुक्तता: बार्शी न्यायालयाचा निकाल