**NEET पेपरफुटी प्रकरणात RCC क्लासेसचे संचालक मोठेगावकर अटक; राज्यभरातील सर्व केंद्रे बंद, विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात**
**NEET पेपरफुटी प्रकरणात RCC क्लासेसचे संचालक मोठेगावकर अटक; राज्यभरातील सर्व केंद्रे बंद, विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात**
**KDM NEWS प्रतिनिधी लातूर/सोलापूर, २१ मे २०२६:** NEET-UG २०२६ परीक्षेतील पेपरफुटी प्रकरणात सीबीआयने लातूर येथील प्रसिद्ध रेणुकाई केमिस्ट्री क्लासेस (RCC) चे संस्थापक आणि संचालक प्रा. शिवराज रघुनाथ मोठेगावकर यांना अटक केल्याने महाराष्ट्रातील कोचिंग क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. अटकेच्या लगतच राज्यभरातील RCC ची सर्व केंद्रे अचानक बंद करण्यात आल्याने NEET व JEE च्या तयारीसाठी प्रवेश घेतलेल्या हजारो विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्रवेश प्रक्रिया पूर्ण होऊन अवघ्या दोन दिवसांत ही घटना घडली. काही विद्यार्थ्यांनी ४० ते ६० हजार रुपये तर काहींनी एक लाख रुपयांपर्यंत फी भरली होती. आता क्लासेस बंद झाल्याने चालू शैक्षणिक वर्षातील त्यांच्या तयारीवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.
RCC क्लासेस महाराष्ट्रात NEET, JEE आणि MHT-CET साठी मोठ्या नेटवर्कसह कार्यरत होते. लातूर मुख्यालयासह राज्याच्या विविध शहरांत शाखा होत्या. सीबीआयने मोठेगावकर यांच्या मोबाइलमध्ये फुटलेले प्रश्नपत्रिकेचे पुरावे मिळाल्याचा दावा केला असून, त्यांना संगनमताने पेपर लीक प्रकरणात सक्रिय भूमिका बजावल्याचे सांगितले आहे. ही अटक प्रकरणातील १० वी अटक आहे.
पालक आणि विद्यार्थ्यांनी फी परतावा व वैकल्पिक व्यवस्थेची मागणी केली आहे. मात्र, सध्या कोणतेही अधिकृत उत्तर उपलब्ध नाही. सीबीआय तपास सुरू असल्याने प्रकरण अधिकाधिक गंभीर होत चालले आहे.
विद्यार्थ्यांच्या भवितव्याची चिंता व्यक्त करत अनेक पालकांनी “आम्ही वर्षभराची तयारी आणि मोठी रक्कम गुंतवली, आता काय करावे?” असे सांगितले. RCC सारख्या मोठ्या संस्थेच्या अचानक बंद होण्याने संपूर्ण कोचिंग क्षेत्रात अस्वस्थता पसरली आहे.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या