**बार्शी : कव्हे येथील श्री हनुमान विद्यामंदिरचा SSC निकाल ८४.२१ टक्के; मुलींची एकहाती बाजी**
**बार्शी : कव्हे येथील श्री हनुमान विद्यामंदिरचा SSC निकाल ८४.२१ टक्के; मुलींची एकहाती बाजी**
**KDM NEWS प्रतिनिधी बार्शी **बार्शी तालुक्यातील कव्हे येथील श्री हनुमान ग्रामीण विकास व शिक्षण प्रसारक मंडळ, कव्हे यांच्या संचालित श्री हनुमान विद्यामंदिर कव्हे येथील माध्यमिक शाळेचा एस.एस.सी. बोर्ड परीक्षा (फेब्रुवारी-मार्च २०२६) चा एकूण निकाल **८४.२१ टक्के** लागला आहे. ग्रामीण भागातील मर्यादित सुविधांमध्येही शाळेने सातत्याने चांगली कामगिरी करत आपली ओळख निर्माण केली आहे.
या परीक्षेत प्रशालेतील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट निकाल देत शाळेचा मान वाढवला. यंदा मुलींनी पूर्णपणे बाजी मारली असून, टॉप तीन क्रमांकांवर मुलींचाच ताबा आहे.
**प्रशालेतील गुणवंत विद्यार्थी :**
- **प्रथम क्रमांक :** कु. शिंगण श्रुती सुहास - **९३.६०%**
- **द्वितीय क्रमांक :** कु. तिकटे अंजली बालाजी - **९१.२०%**
- **तृतीय क्रमांक :** कु. माने आरती लहू - **९०.४०%**
संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष **श्री. माने सिद्धेश्वर वसंतराव** यांनी विद्यार्थ्यांच्या या उत्कृष्ट यशाबद्दल आनंद व्यक्त करत त्यांचे हार्दिक अभिनंदन केले. मुख्याध्यापक **श्री. बिडवे भाऊसाहेब आप्पासाहेब** यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक-शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी व पालकांच्या सततच्या प्रयत्नांमुळे हा निकाल साकारला असल्याचे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले.
शाळेच्या वतीने नमूद करण्यात आले की, ग्रामीण परिसरातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी संस्था सातत्याने प्रयत्नशील आहे. यंदा मुलींच्या उत्कृष्ट कामगिरीने शाळेच्या शैक्षणिक प्रगतीचा नवा आलेख निर्माण झाला आहे. सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी हा निकाल नव्या उमेदीचा आणि यशस्वी भविष्याचा पाया ठरणार आहे.
शिक्षकवर्ग, कर्मचारी आणि पालक यांच्या वतीने सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले असून, त्यांच्या उज्ज्वल भवितव्याची शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या आहेत.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या