**सोलापूर : दूध भेसळीत ९९७ किलो पाम तेल जप्त, माळशिरस दूध संकलन केंद्र बंद**

**सोलापूर : दूध भेसळीत ९९७ किलो पाम तेल जप्त, माळशिरस दूध संकलन केंद्र बंद** 

**KDM NEWS प्रतिनिधी सोलापूर : अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे नवे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर राज्यभरात भेसळखोरांविरुद्ध धडक कारवाई सुरू केली आहे. याच मोहिमेत सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील **जय हनुमान भाईनाथ दूध संकलन केंद्र**वर छापा टाकण्यात आला. येथे ९९७ किलो पाम तेलाचा साठा आढळून आला.

या कारवाईत अकलूज येथील व्यापारी जयकुमार दोशी यांच्याशी संबंधित ठिकाणाचीही तपासणी करण्यात आली. जप्त केलेल्या पाम तेलाची किंमत सुमारे २ लाख ४४ हजार रुपये आहे. हे तेल दूधात भेसळ करण्यासाठी आणले असल्याचा संशय अन्न व औषध प्रशासन विभागाने व्यक्त केला आहे.

कारवाईनंतर जय हनुमान भाईनाथ दूध संकलन केंद्र तात्काळ बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या प्रकरणी पुढील तपास सुरू असून, संबंधितांवर कायद्याची कारवाई करण्यात येणार आहे.

तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वात अन्न सुरक्षा विभागाने राज्यात सलग धडक कारवाया केल्या आहेत. दूध, तूप, खवा, आंबे आदी पदार्थांमध्ये भेसळ आढळल्यास कठोर कारवाई केली जात आहे. ग्राहकांना शुद्ध आणि सुरक्षित अन्न मिळावे, हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.

KDM NEWS प्रतिनिधी 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

**बनावट खतांच्या मोठ्या साठ्यावर कृषी विभागाची धडक कारवाई; सोलापूरमध्ये शेतकऱ्यांची लाखोंची फसवणूक उघड, दोघांवर गुन्हा दाखल**

**बार्शी तालुक्यात निसर्गाचा कोप: श्रीपतपिंपरी येथे वीज पडून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू**

मुख्याध्यापकांची निर्दोष मुक्तता: बार्शी न्यायालयाचा निकाल