**बार्शी : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त 'स्वच्छ नाला – सुंदर परिसर – हरित बार्शी' उपक्रम**
**बार्शी : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त 'स्वच्छ नाला – सुंदर परिसर – हरित बार्शी' उपक्रम**
**KDM NEWS बार्शी प्रतिनिधी**बार्शी (सोलापूर ग्रामीण), दि. ५ जून २०२६** : महाराष्ट्र पोलीस, बार्शी शहर पोलीस ठाण्याच्या वतीने बार्शी नगर परिषद, वृक्ष संवर्धन समिती आणि व्ही. के. मार्ट यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून एक अनोखा स्वच्छता व पर्यावरण संरक्षण उपक्रम राबवण्यात आला. या कार्यक्रमात नाल्याचे सुशोभीकरण, परिसर स्वच्छता आणि वृक्षारोपण करण्यात आले.
कार्यक्रमात बार्शी शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी, नगर परिषद अधिकारी, वृक्ष संवर्धन समितीचे प्रतिनिधी आणि स्थानिक नागरिकांनी सक्रिय सहभाग घेतला. उपस्थितांनी पर्यावरण संरक्षणासाठी प्रत्येक नागरिकाने जबाबदारी घेण्याचे आवाहन केले. 'स्वच्छ नाला – सुंदर परिसर – हरित बार्शी' हा संदेश देणाऱ्या या उपक्रमाने दुर्गंधीमुक्त नाले, स्वच्छता आणि हरित क्षेत्र वाढवण्यावर भर दिला.
बार्शी शहर पोलीस ठाण्याने सामाजिक जबाबदारीतून हा उपक्रम यशस्वी केला असून, यामुळे स्थानिक परिसरात पर्यावरण जागरूकता वाढण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी नागरिकांना अशा उपक्रमांत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
हा उपक्रम बार्शी शहर पोलीस ठाण्याच्या दिनंदिन कामकाजाबरोबरच समाजातील सकारात्मक बदल घडवण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरला.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या