**बार्शी-परांडा रोडवर अपघातात अनोळखी इसमाचा मृत्यू; फरार दुचाकी चालक निष्पन्न**

**बार्शी-परांडा रोडवर अपघातात अनोळखी इसमाचा मृत्यू; फरार दुचाकी चालक निष्पन्न** 

**KDM NEWS बार्शी (प्रतिनिधी):** बार्शी तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत बार्शी ते परांडा रोडवरील हिंगणगाव पाटीजवळील उपळाई ठोंगे शिवारात १ जून २०२६ रोजी रात्री ११.४५ वाजण्याच्या सुमारास एक अनोळखी व्यक्ती अपघातात जागीच मृत्यूमुखी पडली होती. पोलीस तपासात मृत व्यक्तीची ओळख पटवून फरार दुचाकी चालकाला निष्पन्न करण्यात आले आहे.

सोशल मीडियाद्वारे जनजागृती आणि सीसीटीव्ही फुटेज तपासणीद्वारे मृत व्यक्ती सलीम महंमद युनुस उर्फ युसुफ शेख (रा. माऊली चौक, बार्शी) असल्याचे स्पष्ट झाले. अपघाताची तांत्रिक तपासणी करताना हा अपघात महेश राजेंद्र लिमकर (रा. खासगाव, ता. परांडा, जि. धाराशिव) याच्या ताब्यातील मोटरसायकलमुळे झाल्याचे निष्पन्न झाले. लिमकरने अपघात केल्यानंतर फरार झाल्याचे समोर आले.

या प्रकरणी बार्शी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद (गु.र.नं. १७०/२६) करण्यात आला असून, भा.न्या.संहिता कलम १०६(१), १२५(ए)(बी), ३२४ आणि इतर कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सुरू आहे.

मा. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, सहाय्यक पोलीस अधीक्षक अंजना कृष्णा आणि बार्शी तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश माने यांच्या देखरेखीखाली पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत घोळवे, पोहेकॉ रुपेश शेलार, पोकॉ राहूल बोंदर आणि पोकॉ उत्तम चौधरी यांनी ही कामगिरी केली.

सोलापूर ग्रामीण पोलीस दल अपघात रोखण्यासाठी ब्लॅक स्पॉट ओळख, रिफ्लेक्टर, नाकाबंदी, सीसीटीव्ही आणि जनजागृती उपक्रम राबवत आहे. फरार आरोपींवर कडक कारवाई करण्याचे निर्देश पाळले जात आहेत.

KDM NEWS प्रतिनिधी 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

**बनावट खतांच्या मोठ्या साठ्यावर कृषी विभागाची धडक कारवाई; सोलापूरमध्ये शेतकऱ्यांची लाखोंची फसवणूक उघड, दोघांवर गुन्हा दाखल**

**बार्शी तालुक्यात निसर्गाचा कोप: श्रीपतपिंपरी येथे वीज पडून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू**

मुख्याध्यापकांची निर्दोष मुक्तता: बार्शी न्यायालयाचा निकाल