**पत्रकार निलेश झिंगाडे यांची दुचाकी चोरी!घरासमोरून मध्यरात्री चोरट्यांचा धाडसी प्रकार, आता सुरक्षा कुठे?**

**पत्रकार निलेश झिंगाडे यांची दुचाकी चोरी!
घरासमोरून मध्यरात्री चोरट्यांचा धाडसी प्रकार, आता सुरक्षा कुठे?** 

**KDM NEWS बार्शी (प्रतिनिधी):** शहरातील राऊळ गल्ली येथे राहणारे पत्रकार निलेश झिंगाडे यांची दुचाकी आज मध्यरात्री घरासमोरून अज्ञात चोरट्यांनी चोरली. ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली असून, पत्रकारांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

निलेश झिंगाडे यांनी काल रात्री सवयीप्रमाणे आपली दुचाकी घराच्या समोर लावली होती. पहाटेच्या सुमारास बाहेर आल्यावर दुचाकी नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने परिसरात शोध घेतला, मात्र दुचाकीचा काहीही पत्ता लागला नाही. 

**दुचाकीचे क्रमांक :** MH 13 BZ 4834

झिंगाडे हे शहरातील विविध सामाजिक प्रश्न, भ्रष्टाचार आणि स्थानिक मुद्द्यांवर सातत्याने आवाज उठवणारे पत्रकार म्हणून परिचित आहेत. त्यांच्या दुचाकी चोरीच्या घटनेमुळे पत्रकार वर्गामध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. अनेक जणांनी याला पत्रकारांच्या कामावरच केलेला हल्ला म्हणून संबोधले आहे.

दरम्यान, निलेश झिंगाडे यांनी सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की, **MH 13 BZ 4834** क्रमांकाची दुचाकी किंवा त्यासंबंधी काहीही माहिती आढळल्यास तात्काळ **+91 72183 13536** या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा.

**शहरात वाहन चोऱ्यांचे वाढते प्रमाण**

गेल्या काही दिवसांपासून बार्शी शहरात दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या चोऱ्यांच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. रात्रीच्या वेळी सुरक्षा यंत्रणा पुरेशी नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. अनेकांनी रात्रीच्या गस्तीत वाढ करण्याची मागणी केली आहे.

या घटनेबाबत स्थानिक पातळीवरून पोलिस प्रशासनाकडे कडक कारवाईची मागणी होत आहे. 

(संपर्क : निलेश झिंगाडे - 72183 13536)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

**बनावट खतांच्या मोठ्या साठ्यावर कृषी विभागाची धडक कारवाई; सोलापूरमध्ये शेतकऱ्यांची लाखोंची फसवणूक उघड, दोघांवर गुन्हा दाखल**

**बार्शी तालुक्यात निसर्गाचा कोप: श्रीपतपिंपरी येथे वीज पडून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू**

मुख्याध्यापकांची निर्दोष मुक्तता: बार्शी न्यायालयाचा निकाल