**हातभट्टी आणि अवैध दारू विक्रीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी धडक कारवाई**

**हातभट्टी आणि अवैध दारू विक्रीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी धडक कारवाई** 

**KDM NEWS प्रतिनिधी सोलापूर :** पुणे येथील विषारी दारू प्रकरणानंतर सोलापूर जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध हातभट्टी, बनावट दारू उत्पादन आणि विक्रीविरोधात कडक मोहीम राबवली आहे. या विशेष मोहिमेत २३,५६,८४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

**२१ मे ते ३१ मे २०२६** या १० दिवसांत विभागीय उपायुक्त (पुणे विभाग) **सागर धोमकर** यांच्या मार्गदर्शनाखाली अधीक्षक **भाग्यश्री पं. जाधव** आणि उपअधीक्षक **सौरभ बा. अदाटे** यांच्या नेतृत्वात ही कारवाई पार पडली.

           जप्त केलेला मुद्देमाल :
- ४३,१७५ लीटर रसायने
- ३,७८३ लीटर हातभट्टी दारू
- १२५ बॉक्स ताडी
- १६.२ बॉक्स देशी मद्य
- १५.६ बॉक्स बिअर
- ३ वाहने

या कारवाईत **६४ गुन्हे** दाखल करण्यात आले असून **४७ आरोपींना** अटक करण्यात आली आहे.

       प्रशासनाचे आवाहन
पुणे येथे मिथेनॉलयुक्त बनावट दारूने अनेकांचा बळी गेल्याच्या पार्श्वभूमीवर सोलापूर प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. अशा अवैध आणि विषारी दारूचे सेवन केल्याने किडनी निकामी होणे, कायमचे अंधत्व येणे आणि मृत्यू होण्याची शक्यता असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या अमिषाला बळी पडू नये, असे आवाहन उत्पादन शुल्क विभागाने केले आहे. विभागाने अशा प्रकारच्या अवैध धंद्यांवर सतत नजर ठेवली असल्याचेही सांगण्यात आले.

ही कारवाई सोलापूर शहर व जिल्ह्यात अवैध दारू व्यवसाय करणाऱ्यांसाठी मोठा इशारा ठरली आहे.

KDM NEWS प्रतिनिधी 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

**बनावट खतांच्या मोठ्या साठ्यावर कृषी विभागाची धडक कारवाई; सोलापूरमध्ये शेतकऱ्यांची लाखोंची फसवणूक उघड, दोघांवर गुन्हा दाखल**

**बार्शी तालुक्यात निसर्गाचा कोप: श्रीपतपिंपरी येथे वीज पडून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू**

मुख्याध्यापकांची निर्दोष मुक्तता: बार्शी न्यायालयाचा निकाल