**हैदराबाद गॅझेटिअरनुसार कुणबी प्रमाणपत्र देण्याची कार्यप्रणाली निश्चित; गावपातळीवर समिती गठित**
**हैदराबाद गॅझेटिअरनुसार कुणबी प्रमाणपत्र देण्याची कार्यप्रणाली निश्चित; गावपातळीवर समिती गठित**
**KDM NEWS प्रतिनिधी मुंबई/छत्रपती संभाजीनगर ११ सप्टेंबर २०२५: महाराष्ट्र शासनाने हैदराबाद गॅझेटिअरमधील नोंदी विचारात घेऊन मराठा समाजातील पात्र व्यक्तींना कुणबी, मराठा-कुणबी किंवा कुणबी-मराठा जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी स्पष्ट कार्यपद्धती जाहीर केली आहे. २ सप्टेंबर २०२५ रोजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने जारी केलेल्या शासन निर्णयानुसार ही प्रक्रिया पारदर्शक व जलद होणार आहे.
**गावपातळीवर समिती:**
प्रमाणपत्र प्रक्रियेसाठी प्रत्येक गावात समिती गठित करण्यात आली आहे. या समितीत ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी आणि सहाय्यक कृषी अधिकारी यांचा समावेश आहे. ही समिती अर्जदारांची चौकशी करून तालुकास्तरीय समितीकडे अहवाल सादर करेल.
**अर्ज प्रक्रिया:**
- अर्जदाराने तालुकास्तरीय समितीकडे अर्ज सादर करावा.
- **आवश्यक पुरावे:** मराठा समाजातील भुधारक, भूमिहीन, शेतमजूर किंवा बटाईदार यांनी शेतजमिनीची मालकी पुरावा म्हणून सादर करावी.
- पुरावा नसल्यास १३ ऑक्टोबर १९६७ पूर्वी पूर्वज स्थानिक क्षेत्रात राहत असल्याबाबत प्रत affidavit (शपथपत्र) सादर करावे.
- गावातील/कुळातील/नातेसंबंधातील व्यक्तींना आधीच कुणबी प्रमाणपत्र मिळाले असल्यास त्यांचे शपथपत्र जोडावे.
- इतर उपलब्ध पुरावे (जसे महसुली नोंदी, शैक्षणिक प्रमाणपत्रे इ.) सादर करता येतील.
**चौकशी व निर्णय:**
तालुकास्तरीय समिती अर्ज छाननी करून गाव समितीकडे चौकशीसाठी पाठवेल. गाव समिती वयस्कर नागरिक, ज्येष्ठ, पोलिस पाटील यांच्यासमोर चौकशी करून अहवाल देईल. तालुकास्तरीय समिती अहवालावर आधारित शिफारस करेल आणि सक्षम प्राधिकारी (तहसीलदार/उपविभागीय अधिकारी) अंतिम निर्णय घेतील.
ही कार्यपद्धती मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर सरकारने मान्य केलेल्या मागणीनुसार आली आहे. मराठवाड्यातील पात्र मराठा बांधवांना ओबीसी प्रवर्गातील सवलती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अर्जदारांनी तहसील कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या