**बार्शी : तांबेवाडी तांड्यात वन विभागाची मोठी कारवाई; ३० ते ३५ टन अवैध लाकूड जप्त**

**बार्शी : तांबेवाडी तांड्यात वन विभागाची मोठी कारवाई; ३० ते ३५ टन अवैध लाकूड जप्त** 

**KDM NEWS प्रतिनिधी बार्शी (सोलापूर) : मौजे तांबेवाडी तांडा येथे वन विभागाने ३ जून २०२६ रोजी धडक कारवाई करत सुमारे ३० ते ३५ टन अवैध लाकडाचा साठा जप्त केला. या कारवाईत लिंब, आंबा, चिंचसह विविध प्रजातींच्या झाडांची बेकायदेशीर तोड केल्याप्रकरणी १२ ते १३ शेतकऱ्यांवर ‘महाराष्ट्र वृक्षतोड (नियमन) अधिनियम १९६४’ अंतर्गत वन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

वन विभागाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, काही शेतकऱ्यांनी स्वतःच्या मालकीच्या शेतात आणि घराच्या परिसरात विनापरवाना वृक्षतोड केल्याचे समोर आले. या माहितीच्या आधारे वन पथकाने तातडीने छापा टाकला. छाप्यात प्रचंड प्रमाणात कापलेले लाकूड साठवलेले आढळले. हे सर्व लाकूड जप्त करून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.

**अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली यशस्वी कारवाई**  
सोलापूरचे उपवनसंरक्षक कुलराज सिंह आणि सहाय्यक वनसंरक्षक (रोहित) अजित शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली. बार्शी वनपरिक्षेत्र अधिकारी एस. एस. बडे यांनी मोहिमेचे नेतृत्व केले. यात वनपाल डी. बी. शिदोडकर, ए. आर. पिरजादे, वनरक्षक बालाजी धुमाळ, सचिन पुरी, करामत अली शेख, सुलतान शेख, पूजा खेणे, वनमजूर आशा बी. अन्सारी तसेच वाहनचालक सिद्धेश्वर जाधव आणि शाबाज मुल्ला यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

वन विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, अवैध वृक्षतोड, बेकायदेशीर लाकूड वाहतूक किंवा वन्यजीव शिकार हे गंभीर गुन्हे आहेत. अशा प्रकारच्या घटना आढळल्यास तात्काळ वन विभागाशी संपर्क साधावा. वृक्षसंवर्धन ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे.

ही कारवाई अवैध वृक्षतोड रोखण्यासाठी वन विभागाच्या दक्षतेचे प्रतिक मानली जात आहे. पुढील तपासात अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

KDM NEWS प्रतिनिधी 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

**बनावट खतांच्या मोठ्या साठ्यावर कृषी विभागाची धडक कारवाई; सोलापूरमध्ये शेतकऱ्यांची लाखोंची फसवणूक उघड, दोघांवर गुन्हा दाखल**

**बार्शी तालुक्यात निसर्गाचा कोप: श्रीपतपिंपरी येथे वीज पडून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू**

मुख्याध्यापकांची निर्दोष मुक्तता: बार्शी न्यायालयाचा निकाल