**पावसात भिजले, हिंदुत्वाचे रणशिंग फुंकले; उद्धव ठाकरेंच्या 'रामरक्षा आंदोलना'ने दादर दणाणले!**
**पावसात भिजले, हिंदुत्वाचे रणशिंग फुंकले; उद्धव ठाकरेंच्या 'रामरक्षा आंदोलना'ने दादर दणाणले!**
#KDM NEWS प्रतिनिधी मुंबई ५ जुलै : मुंबईतील दादर येथील श्री हनुमान मंदिरात मुसळधार पावसात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख **उद्धव ठाकरे** यांनी ‘रामरक्षा आंदोलन’ अंतर्गत महाआरती व भाषण केले. ना छत्री, ना रेनकोट, फक्त भगवा सदरा घालून ते चिंब भिजले तरी कार्यकर्त्यांना संबोधित करत राहिले. या दृश्याने उपस्थित हजारो रामभक्तांच्या मनात हिंदुत्वाची ज्योत अधिक प्रखर केली.
उद्धव ठाकरे म्हणाले, “हा हिंदू वेडा नाही. पावसात चिंब भिजूनही रामरक्षा, मारुती स्तोत्र आणि हनुमान चालीसा म्हणतोय. ही पावसात पेटलेली ठिणगी आहे.” त्यांच्या भाषणाला कार्यकर्त्यांनी जोरदार प्रतिसाद दिला. त्यांनी अयोध्येतील राम मंदिरातील कथित देणगी अपहाराच्या पार्श्वभूमीवर हा आंदोलन सुरू केल्याचे स्पष्ट केले.
“हिंदूंच्या श्रद्धेचा गैरफायदा घेऊन मंदिर लुटणाऱ्यांना आता माफ केले जाणार नाही. आम्हाला भाजपमुक्त राम हवा आहे, राम सर्वांचा आहे,” असे ठाकरे यांनी सांगितले. त्यांनी हनुमानाच्या मशालीचा उल्लेख करत अन्यायाविरुद्ध लढण्याचा निर्धार व्यक्त केला.
**आंदोलनाची पार्श्वभूमी**
शिवसेना (उबाठा) ने ३ जुलैला दादर येथे आंदोलनाची घोषणा केली होती. अयोध्या राम मंदिरातील देणग्यांमध्ये कथित गैरव्यवहाराच्या आरोपांविरुद्ध राज्यव्यापी आंदोलन सुरू करण्यात आले आहे. या आंदोलनात रामभक्त, हिंदू संघटना आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.
पावसाच्या तडाख्यातही मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेल्या कार्यकर्त्यांनी रामरक्षा स्तोत्र, हनुमान चालीसा आणि आरतीचा गजर केला. हा कार्यक्रम मुंबईसह राज्यभरात रामरक्षेच्या लाटेला सुरुवात करणारा ठरला असल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले.
ठाकरेंच्या या आक्रमक भूमिकेने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. आंदोलन राज्यातील इतर भागांतही विस्तारित करण्याची तयारी सुरू असल्याचे सूचित करण्यात आले.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या