उजनी धरण बॅकवॉटर बोट दुर्घटनेत करमाळा आदिनाथ कारखान्याचे चेअरमन धनंजय डोंगरेंचा मुलगा बुडाला
इंदापूर तालुक्यातील कळाशी येथून सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील कुगावकडे येताना वादळी वाऱ्याने बोटीचा अपघात झाला.सोलापुरातल्या उजनी धरणात (Solapur Ujani Boat) बुडालेली बोट सापडली आहे. 17 तासाच्या अथक प्रयत्नानंतर अखेर बोस सापडली आहे. 35 फूट पाण्यात तळाशी ही बोट सापडल्याची माहिती समोर आली आहे, मात्र बुडालेल्यांना शोधण्यात अद्याप NDRF ला यश आलेले नाही. मात्र सहा प्रवासी अद्यापही बेपत्ता आहेत. बेपत्ता सहा प्रवासी दगावल्याची शक्यता आहे. मंगळवारी सायंकाळी सहाच्या दरम्यान उजनी जलाशयात जलवाहतूक करणारी बोट पाण्यात बुडाली होती. 17 तासानंतर बोट सापडली आहे. मात्र इतर सहा प्रवासी अजूनही बेपत्ता आहेत. घटनेची माहिती समजताच पोलीस प्रशासन घटनास्थळी पोचले असून स्थानिक बोटींच्या मदतीने शोध सुरु करण्यात आला आहे. या बोटमध्ये असलेला एक जण पोहत बाहेर आल्याने घटना उघडकीस आली आणि त्यानंतर बचावकार्य सुरु झालं. सोलापूर जिल्ह्यातील कुगाव ते इंदापूर अशी बोट वाहतूक सुरु असताना ही दुर्घटना घडली होती.. बोट बुडत असताना बोटीतून प्रवास करणारे पोलीस उपनिरीक्षक राहुल डोंगरेंनी पाण्यात उ...