सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणात एक बोट बेपत्ता झाली. यात सहा जण कालपासून बेपत्ता

बुडाल्यांमध्ये एक महिला, तीन पुरुष आणि दोन लहान मुलांचा समावेश आहे. या बोटीतील एकजण पोहत कडेला आला. राहुल डोंगरे असे संबंधिताचे नाव आहे.सोलापूर : उजनीच्या पात्रात बोट बुडून (Boat Drowned) एक मोठी दुर्घटना घडली.यामध्ये पती-पत्नी व त्यांची दोन लहान मुले आणि इतर दोघे असे एकूण सहाजण बुडाल्याची माहिती दिली जात आहे. या दुर्घटनेत एकजण कळाशीकडे पोहत आल्याने बचावला असून, इतरांचा शोध सुरू आहे. ही बोट कुगाव (ता. करमाळा) ते कळाशी (ता. इंदापूर) या दरम्यान उलटली.

गोकुळ दत्तात्रय जाधव (वय ३०), कोमल गोकुळ जाधव (वय २५), शुभम गोकूळ जाधव (वय दीड वर्ष), माही गोकूळ जाधव (वय ३, रा. झरे, ता. करमाळा, जि. सोलापूर), कुगाव येथील अनुराग अवघडे (वय ३५) व गौरव डोंगरे (वय १६), अशी बोट उलटून बुडाल्यांची नावे आहेत. भीमा नदीच्या पात्रात करमाळा तालुक्यातील कुगाव येथून ही बोट मंगळवारी (ता.21) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास इंदापूर तालुक्यातील कळाशी या गावाकडे येत होती. त्यात कुगाव व झरे (ता. करमाळा) येथील सात प्रवासी होते. यावेळी जोरदार वादळ सुटल्याने ती बोट उलटली.

धरणात बुडाल्यांमध्ये एक महिला, तीन पुरुष आणि दोन लहान मुलांचा समावेश आहे. या बोटीतील एकजण पोहत कडेला आला. राहुल डोंगरे असे संबंधिताचे नाव आहे. राहुल यांना प्राथमिक उपचारासाठी इदापूर येथील उपजिल्हा रुग्णालय दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

**बनावट खतांच्या मोठ्या साठ्यावर कृषी विभागाची धडक कारवाई; सोलापूरमध्ये शेतकऱ्यांची लाखोंची फसवणूक उघड, दोघांवर गुन्हा दाखल**

मुख्याध्यापकांची निर्दोष मुक्तता: बार्शी न्यायालयाचा निकाल

**बार्शी बाजार समितीत शेतकऱ्यांची लूट: वरद ट्रेडर्सच्या चोरीचा व्हिडिओ व्हायरल, ड्रायव्हरांना कमिशन देऊन माल आणण्याचा गोरखधंदा**