पोस्ट्स

ऑगस्ट, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

*बार्शीत पोलिसांची मटका अड्ड्यांवर धडक कारवाई; तीन जण ताब्यात, रोख रक्कम व साहित्य जप्त*

इमेज
*बार्शीत पोलिसांची मटका अड्ड्यांवर धडक कारवाई; तीन जण ताब्यात, रोख रक्कम व साहित्य जप्त*  *KDM NEWS प्रतिनिधी बार्शी, ३१ ऑगस्ट : बार्शी शहर पोलीस ठाण्याने सोमवारी पेट्रोलिंगदरम्यान माहिती मिळताच कल्याण मटका जुगार खेळणाऱ्या तीन जणांना वेगवेगळ्या ठिकाणी पकडले. रोख रक्कम आणि जुगार साहित्य जप्त करण्यात आले. महाराष्ट्र जुगार कायद्याच्या कलम १२(अ) अंतर्गत गुन्हे दाखल झाले आहेत. सपोनि झालटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोकॉ/१ सचिन अशोक नितनात, पोहेकॉ साठे आणि म कोतवाल यांच्या पथकाकडे बातमी मिळाली की सोलापूर रोडवरील ८ नंबर शाळेसमोर बंद टपरीजवळ एक इसम ये-जा करणाऱ्या लोकांकडून अंक आकड्यांवर पैज लावून मटका खेळवत आहे. पंचासह घटनास्थळी गेल्यावर दुपारी १.१५ वाजता संजय दत्तु भालशंकर (२९, बगले बरड, सोलापूर रोड, बार्शी) याला कागदावर आकडे मोडताना पकडले. त्याच्याकडून २५० रुपये रोख, पांढरा कागद (आकडेमोड) आणि निळ्या शाईचा बॉलपेन जप्त करण्यात आले. दुसऱ्या घटनेत पोकॉ/१८६० अजिज मनसुब शेख यांच्या पथकाकडे बस स्टँड परिसरातील माहिती मिळाली. दुपारी १२.२५ वाजता संदेश राजे मिल्क दुकानासमोर रविंद्र तानाजी ...

**मुलाखतींचे सीसीटीव्ही रेकॉर्डिंग आता बंधनकारक; प्राध्यापक भरतीत पारदर्शकतेचा नवा अध्याय**

इमेज
**मुलाखतींचे सीसीटीव्ही रेकॉर्डिंग आता बंधनकारक; प्राध्यापक भरतीत पारदर्शकतेचा नवा अध्याय**  **KDM NEWS** | मुंबई, १ सप्टेंबर राज्यातील अशासकीय अनुदानित वरिष्ठ महाविद्यालयांमधील सहाय्यक प्राध्यापक पदांच्या भरती प्रक्रियेत मोठा बदल करण्यात आला आहे. आता संपूर्ण मुलाखत प्रक्रिया सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये रेकॉर्ड करावी लागणार असून, अंतिम निवड यादी महाविद्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे अनिवार्य केले आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी ही महत्त्वपूर्ण माहिती दिली. शासनाच्या नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार, भरती प्रक्रियेतील प्रत्येक टप्प्यावर पारदर्शकता आणि गुणवत्तेला प्राधान्य दिले जाणार आहे. शासनाचे ना-हरकत प्रमाणपत्र मिळाल्यानंतर संबंधित महाविद्यालयाने जाहिरातीचा मसुदा विद्यापीठाकडे मान्यतेसाठी सादर करणे आवश्यक आहे. विद्यापीठाने यूजीसीच्या नियमांनुसार शैक्षणिक पात्रता, सामाजिक आरक्षण आणि समांतर आरक्षणाची अचूक तपासणी करावी. ही जबाबदारी विद्यापीठाच्या मागासवर्ग कक्षाची राहील. मान्यता मिळाल्यानंतर जाहिरात राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय वृत्तपत्रांत प्रसिद...

*बीडची जिद्द! पतीच्या निधनानंतर संकटांशी दोन हात; ४७ वर्षीय रमाबाईंनी साडीत आणि अनवाणी पायांनी जिंकली मॅरेथॉन*

इमेज
*बीडची जिद्द! पतीच्या निधनानंतर संकटांशी दोन हात; ४७ वर्षीय रमाबाईंनी साडीत आणि अनवाणी पायांनी जिंकली मॅरेथॉन*  KDM NEWS प्रतिनिधी बीड, १ सप्टेंबर : संकटांशी मुकाबला करत पोटाची खळगी भरणाऱ्या आणि लेकरांच्या भविष्यासाठी अजेय संघर्ष करणाऱ्या एका माउलीने आपल्या जिद्दीच्या बळावर साऱ्या महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले आहे. पतीच्या निधनानंतर लेकरांच्या शाळेची फीस भरण्यासाठी पैशांची चणचण भासत असताना, ४७ वर्षीय रमाबाई यांनी चप्पलविना, अगदी अनवाणी पायांनी आणि साडी नेसूनच मॅरेथॉन स्पर्धेत भाग घेतला. विशेष म्हणजे, आपल्या अदम्य साहसाच्या जोरावर त्यांनी ही स्पर्धा जिंकत तीन हजार रुपयांचे बक्षीसही आपल्या नावावर केले. बीड जिल्ह्याच्या या प्रेरणादायी महिलेची कहाणी आज संपूर्ण राज्यात कौतुकाचा विषय ठरत असून, तिच्या या संघर्षमय विजयाने अनेकांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. रमाबाई यांच्या कुटुंबावर काही काळापूर्वी दुःखाचा डोंगर कोसळला. पतीच्या अकाली निधनानंतर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली. दोन वेळच्या अन्नाची भ्रांत असताना मुलींच्या शिक्षणाचा आणि शाळेच्या फीसचा प्रश्न बिकट ब...

​बार्शी तालुक्यातील चारे गावात पुन्हा वाघाचा वावर; हल्ल्यात म्हैस जागीच ठार

इमेज
बार्शी तालुक्यातील चारे गावात पुन्हा वाघाचा वावर; हल्ल्यात म्हैस जागीच ठार  बार्शी, सोलापूर : बार्शी तालुक्यातील चारे गाव परिसरात पुन्हा वाघाचा वावर आढळल्याने ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली आहे. वाघाने मेजर पापा यांच्या म्हशीवर हल्ला करून तिला जागीच ठार केल्याची माहिती समोर आली आहे. गावकऱ्यांनी सोशल मीडियावर वाघ दिसल्याचे फोटो-व्हिडिओ प्रसारित केले. यापूर्वीही चारे परिसरात वाघ दिसल्याच्या घटना घडल्या होत्या. आता पुन्हा हल्ला झाल्याने शेतकरी आणि नागरिक भीतीत आहेत. येडशी, रामलिंग परिसर तसेच बार्शी तालुक्यातील नागरिकांनी सतर्क राहावे. शेतात एकट्याने जाऊ नये, रात्री घराबाहेर पडताना काळजी घ्यावी. लहान मुले व जनावरे सुरक्षित ठिकाणी ठेवावीत. वाघ दिसल्यास पाठलाग करू नये किंवा गर्दी करून जवळ जाऊ नये. अफवा न पसरवता वन विभाग व पोलिसांना तातडीने माहिती द्यावी. ग्रामस्थांनी संबंधित यंत्रणांकडे तातडीने पाहणी करून वाघाच्या हालचालींची खात्री करण्याची आणि सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. चारेसह येडशी, रामलिंग व तालुक्यातील नागरिकांनी सावध राहावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

*सोलापूर : खरीप पीक कर्ज वाटपात १०० टक्के उद्दिष्ट अनिवार्य; खातेदार संख्याही ७५ टक्के असावी - जिल्हाधिकारी*

इमेज
*सोलापूर : खरीप पीक कर्ज वाटपात १०० टक्के उद्दिष्ट अनिवार्य; खातेदार संख्याही ७५ टक्के असावी - जिल्हाधिकारी*  *KDM NEWS प्रतिनिधी सोलापूर, ३१ ऑगस्ट : जिल्ह्यातील सर्व बँकांनी खरीप हंगाम २०२६-२७ साठी पीक कर्ज वाटपाचे १०० टक्के उद्दिष्ट पूर्ण करावे तसेच खातेदारांची संख्याही किमान ७५ टक्के राखावी, असे निर्देश जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी दिले. जिल्हास्तरीय सल्लागार समितीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी वार्षिक पतपुरवठा आराखडा २०२६-२७ आणि सोलापूर आरसेटीचा वार्षिक अ‍ॅक्टिव्हिटी रिपोर्ट २०२५-२६ यांचे त्यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. खरीप हंगामासाठी पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट २ हजार ८५८ कोटी रुपये असून जून २०२६ अखेरपर्यंत १ हजार ६५० कोटी रुपये (५७ टक्के) वाटप झाले आहे. मात्र खातेदारांची संख्या खूपच कमी असल्याने रकमेबरोबरच खातेदार संख्येवरही लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले. पुढील त्रैमासिक बैठकीपूर्वी खातेदार संख्या ५० टक्क्यांपर्यंत नेण्याचे काटेकोर नियोजन करावे. उद्दिष्ट पूर्ण न करणाऱ्या बँकांकडील शासकीय ठेवी काढून घेऊन उद्दिष्टपूर्ती करणाऱ्...

*बार्शी : सारोळे ग्रामपंचायत प्रकरणी उपोषणाची तक्रार; विस्तार अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश*

इमेज
*बार्शी : सारोळे ग्रामपंचायत प्रकरणी उपोषणाची तक्रार; विस्तार अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश*  *KDM NEWS प्रतिनिधी बार्शी*सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील सारोळे येथील श्रीमती प्रभावती रमेश साबळे यांनी दि. ३१ ऑगस्ट २०२६ रोजी उपोषणाला बसण्याबाबत पंचायत समिती बाशीच्या ग्रामपंचायत विभागाला अर्ज दिला आहे. या अर्जाच्या अनुषंगाने पंचायत समिती बाशीने तातडीने कारवाई केली आहे. पंचायत समिती बाशीच्या ग्रामपंचायत विभागाने (जा.क्र. पंसबा/ग्राप-२/४०५८/२०२६, दि. ३१/०८/२०२६) विस्तार अधिकारी श्री. पी. एस. कुलकर्णी यांना आदेश दिले आहेत. त्यानुसार त्यांनी दि. ३ सप्टेंबर २०२६ रोजी संबंधित ग्रामपंचायतीला भेट देऊन तक्रार अर्जातील मुद्द्यांची मुद्देनिहाय चौकशी करून अहवाल तात्काळ सादर करावा, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. सहायक प्रशासन अधिकारी, पंचायत समिती बाशी यांच्या स्वाक्षरीने जारी केलेल्या या आदेशात तक्रार अर्जाची प्रतही जोडण्यात आली आहे. प्रत तक्रारदार श्रीमती प्रभावती रमेश साबळे (रा. सारोळे, ता. बार्शी, जि. सोलापूर) तसेच सारोळे ग्रामपंचायतीचे सरपंच/प्रशासक/ग्रामसेवक यांना माहितीसाठी पा...

*सोलापूर : ६५०-६५८ ग्रामपंचायतींचा कारभार कोणाकडे? प्रशासकांची मुदत संपली, शासनाकडून मार्गदर्शन नाही*

इमेज
*सोलापूर : ६५०-६५८ ग्रामपंचायतींचा कारभार कोणाकडे? प्रशासकांची मुदत संपली, शासनाकडून मार्गदर्शन नाही*  *KDM NEWS प्रतिनिधी सोलापूर*सोलापूर जिल्ह्यातील सुमारे ६५० ते ६५८ ग्रामपंचायतींचा पाच वर्षांचा कार्यकाळ जानेवारी-फेब्रुवारी २०२६ मध्ये संपला. त्यानंतर राज्य शासनाने विद्यमान सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांनाच प्रशासक व प्रशासकीय समिती म्हणून सहा महिन्यांसाठी नियुक्त केले होते. ही मुदत गेल्या आठवड्यात (२३ ऑगस्टच्या आसपास) संपली आहे. आता गावचा कारभार कोण हाकणार, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. शासनाकडून अद्याप कोणतेही स्पष्ट मार्गदर्शन जिल्हा परिषदेला मिळालेले नाही. नव्याने शासकीय अधिकाऱ्यांची (विस्ताराधिकारी किंवा समकक्ष) नियुक्ती होणार की आधीच्या पदाधिकाऱ्यांनाच पुन्हा मुदतवाढ मिळणार, हे स्पष्ट नाही. त्यामुळे अनेक गावांमध्ये प्रशासकीय पेच निर्माण झाला आहे. ### निवडणुकांना विलंब का? गेल्या काही महिन्यांत ग्रामपंचायत निवडणुकीच्या तयारीच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. मात्र केंद्रीय निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) मोहिमेमुळे मतदार यादी अद्ययावत होत असल्याने निव...

*एसटी सोलापूर विभागात ३०६ शिकाऊ उमेदवारांची भरती; अर्ज नोंदणीची अंतिम मुदत १४ सप्टेंबर*

इमेज
**एसटी सोलापूर विभागात ३०६ शिकाऊ उमेदवारांची भरती; अर्ज नोंदणीची अंतिम मुदत १४ सप्टेंबर**  *KDM NEWS प्रतिनिधी सोलापूर, ३१ ऑगस्ट (जि.मा.का.) : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एमएसआरटीसी) सोलापूर विभागात शिकाऊ उमेदवार भरती २०२६-२७ अंतर्गत एक वर्षाच्या कालावधीसाठी एकूण ३०६ शिकाऊ उमेदवारांची भरती करण्यात येणार आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी www.apprenticeshipindia.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर ‘MSRTC Solapur Division’ या आस्थापनेसाठी रजिस्ट्रेशन क्रमांक E09162700889 वर नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. नाव नोंदणीची अंतिम मुदत १४ सप्टेंबर २०२६ आहे. भरतीबाबत अधिक माहितीसाठी इच्छुक उमेदवारांनी विभागीय कार्यालय, १९० बुधवार पेठ, सोलापूर-४१३००२ येथे संपर्क साधावा, असे आवाहन विभाग नियंत्रक अमोल चंदकांत गोंजारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. ही भरती शिकाऊ उमेदवार योजनेअंतर्गत असून प्रशिक्षण कालावधी एक वर्षाचा राहील. पात्र उमेदवारांनी वेळेत ऑनलाइन नोंदणी पूर्ण करावी, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. KDM NEWS प्रतिनिधी 

"कार्यक्रम रद्द करा, नाहीतर..."; मनोज जरांगे पाटील यांचा खासदार बंडू जाधव यांना थेट इशारा

इमेज
"कार्यक्रम रद्द करा, नाहीतर..."; मनोज जरांगे पाटील यांचा खासदार बंडू जाधव यांना थेट इशारा  #KDM NEWS प्रतिनिधी #अंतरवाली_सराटी (जालना) येथे मराठा #आरक्षणासाठी आमरण उपोषणावर असलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी परभणीचे खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांना फोनवरून थेट इशारा दिला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज परभणीत होणाऱ्या शेतकरी-युवा संवाद मेळाव्याबाबत जरांगे म्हणाले, “कार्यक्रम तात्काळ रद्द करा. नाहीतर मी तिथे येईन.” बंडू जाधव यांनी मात्र ठामपणे सांगितले की परभणीतील कार्यक्रम होणारच. यावर जरांगे पाटील संतापले. ते म्हणाले, “तू एक लक्षात ठेव. शेतकऱ्यांच्या आडून मराठ्यांच्या अंगावर शिरसाटांचे ऐकून शेतकऱ्याच्या कार्यक्रमाच्या नावाखाली शिंदेंना नाचवलंस. आता याची परतफेड होणार आहे. १२ सप्टेंबरला आमची तारीख जाहीर होईल. परतफेड मुंबईत होणार. बंडूला उतरता कळी लागली.” जरांगे यांनी पुढे म्हटले की परभणीच्या सर्व बॉर्डर्स सील केल्या आहेत. त्यामुळे परभणीत ताकद वाया घालवण्यापेक्षा मुंबईत जाऊन आंदोलन करणार आहोत. “बंडू जाधव हा थर्ड क्लास माणूस निघाला. ५०० गुंड असतील तरी त...

*कोविड काळातील मराठा आक्रोश मोर्चा: आमदार विजयकुमार देशमुख, राजेंद्र राऊतांसह ३० जण न्यायालयात उपस्थित*

इमेज
*मराठा आक्रोश मोर्चा: कोविड नियमभंग प्रकरणी चार विद्यमान आमदारांसह ३० आरोपी न्यायालयात हजर*  *KDM NEWS प्रतिनिधी सोलापूर :** मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी ४ जुलै २०२१ रोजी काढण्यात आलेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या आक्रोश मोर्चाप्रकरणी चार विद्यमान आमदारांसह एकूण ३० आरोपी आज प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्री. शिंदे यांच्या न्यायालयात हजर झाले. या खटल्यात एकूण ४८ आरोपी असून, त्यापैकी ३० जणांनी हजेरी लावली. आरोपींमध्ये विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, समाधान अवताडे व राजेंद्र राऊत यांचा समावेश आहे. माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे आणि माजी खासदार जय सिद्धेश्वर महाराज यांच्यासह इतर नेते व कार्यकर्तेही आरोपी आहेत. कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर सोलापूर महानगरपालिकेने मोर्चाला परवानगी नाकारली होती. तरीही समन्वयक राम जाधव व किरण पवार यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आल्याचा आरोप आहे. फौजदार चावडी पोलिस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ देशमाने यांनी फिर्याद दाखल केली होती. पोलिसांनी तपास पूर्ण करून दोषारोपपत्र सादर केले आहे. समन्स प्राप्त झाल्यानंतर आज आमदारांसह इतर ...

**बार्शी : हर्निया ऑपरेशनमधील कथित निष्काळजीपणामुळे ६० वर्षीय रुग्णाचा मृत्यू; कुटुंबीयांनी पोलीस तक्रार**

इमेज
*बार्शी : हर्निया ऑपरेशनमधील कथित निष्काळजीपणामुळे ६० वर्षीय रुग्णाचा मृत्यू; कुटुंबीयांनी पोलीस तक्रार* *KDM NEWS प्रतिनिधी बार्शी, २९ ऑगस्ट : बार्शी येथील यादव हॉस्पिटलमध्ये हर्निया ऑपरेशनदरम्यान डॉक्टरांकडून कथित निष्काळजीपणा व चुकीच्या उपचारांमुळे डोमगाव (ता. परांडा, जि. धाराशिव) येथील ६० वर्षीय हंबीरराव नामदेव साबळे यांचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप कुटुंबीयांनी केला आहे. मृतांच्या कन्या सारिका गुरुदास पाटील (रा. देवगांव बु., ता. परांडा) यांनी बार्शी शहर पोलीस ठाण्याला अर्ज देऊन डॉ. बी. एस. यादव यांच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधासारख्या गुन्ह्याची नोंद करण्याची मागणी केली आहे. अर्जात म्हटले आहे की, १० ऑगस्ट २०२६ रोजी सोमवारी यादव हॉस्पिटलमध्ये डॉ. बी. एस. यादव यांनी हंबीरराव साबळे यांचे हर्निया ऑपरेशन केले. ऑपरेशनानंतर रुग्णाची प्रकृती अचानक गंभीर झाली. त्यानंतर डॉक्टरांनी सीटी स्कॅनसाठी जगताळेमामा हॉस्पिटलमध्ये दाखल केले. १३ ऑगस्ट रोजी डॉ. यादव, डॉ. पोकळे व डॉ. मोराळे यांनी मिळून “आतड्याला छिद्र पडले” असे सांगत पोटाचे दुसरे ऑपरेशन केले. त्यानंतरही प्रकृती आणखी खालावल्याने १...

*बार्शी-सोलापूर रस्त्यावर भीषण अपघात; टमटम चालकाचा जागीच मृत्यू, छोटा हत्तीच्या धडकेत वाहन पलटी*

इमेज
*बार्शी-सोलापूर रस्त्यावर भीषण अपघात; टमटम चालकाचा जागीच मृत्यू, छोटा हत्तीच्या धडकेत वाहन पलटी*  *KDM NEWS प्रतिनिधी  बार्शी (सोलापूर) : बार्शी ते सोलापूर जाणाऱ्या रस्त्यावर मध्यरात्री भीषण रस्ते अपघात झाला. यात टमटम चालकाचा जागीच मृत्यू झाला असून आरोपी चालकही जखमी झाला आहे. दोन्ही वाहनांचे सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले. **घटनास्थळ व वेळ**   दिनांक २९ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री सुमारे १२.३० वाजता मौजे सौंदरे (तालुका बार्शी) येथील बार्शी-सोलापूर रस्त्यावर आधळकर फार्म हाऊससमोरील गतीरोधकजवळ हा अपघात घडला. बार्शी तालुका पोलीस ठाण्यापासून दक्षिणेस सुमारे सात किलोमीटर अंतरावर ही घटना घडली. **अपघाताचे स्वरूप**   आरोपी दत्तात्रय भारत वरवडे (वय ३४, रा. श्रीराम चौक, मोडनिंब, तालुका माढा, जिल्हा सोलापूर) यांनी त्यांच्या ताब्यातील छोटा हत्ती वाहन (क्रमांक एमएच १४ जीडी १७८२) अविचाराने, हयगईने व रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगाने चालवले. त्यामुळे त्यांचे वाहन समोरील टमटम (क्रमांक ४२ बी ३७७७) याला पाठीमागून जोरात धडकले. टमटम पलटी झाली. टमटम...

*बार्शी : सामाईक विहिरीच्या पाण्यावरून चुलतभावाने लोखंडी गजाने डोक्यात मारले; शेतकरी आयसीयूमध्ये*

इमेज
*बार्शी : सामाईक विहिरीच्या पाण्यावरून चुलतभावाने लोखंडी गजाने डोक्यात मारले; शेतकरी आयसीयूमध्ये*  *KDM NEWS प्रतिनिधी बार्शी*बार्शी तालुक्यातील उंबरगे गावात सामाईक विहिरीच्या पाण्याच्या वादातून चुलतभावाने शेतकऱ्यावर हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. फिर्यादी सध्या जगदाळे मामा हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये उपचाराधीन आहे. दि. २७ ऑगस्ट २०२६ रोजी संध्याकाळी सुमारे ५ वाजता मौजे उंबरगे येथील शेती गट क्रमांक १०५ येथे घटना घडली. फिर्यादी अमर माणिक जाधव (वय ३५, शेतकरी, रा. उंबरगे) आणि त्यांची आई चंद्रकला यांनी सामाईक विहिरीतून इलेक्ट्रिक मोटरने सोयाबीन पिकाला पाणी देत असताना फिर्यादीचे चुलतभाऊ नितीन जनक जाधव आणि चुलते जनक पांडुरंग जाधव तेथे आले. नितीनच्या हातात लोखंडी गज होता. त्याने “तू मोटर का चालू केली?” अशी शिवीगाळ करत फिर्यादीच्या डाव्या बाजूच्या डोक्यात आणि उजव्या हातावर लोखंडी गजाने मारहाण केली. त्याचवेळी जनक पांडुरंग जाधव यांनी दगडाने फिर्यादीच्या पाठीत मारले. भांडण सोडविण्यासाठी आई हस्तक्षेप करत असताना रामदास जनक जाधव आला आणि त्याने फिर्यादी व आईला जिवे मारण्याची धमकी दिली....

*बार्शी तालुक्यात अवैध दारूविक्रीवर पोलिसांचे छापे; ५ जण अटकेत, मोटारसायकलसह मुद्देमाल जप्त*

इमेज
*बार्शी तालुक्यात खाकीचा दणका: अवैध दारूविक्री करणाऱ्या ५ जणांवर धडक कारवाई!*  **KDM NEWS प्रतिनिधी बार्शी**सोलापूर, २९ ऑगस्ट :** बार्शी तालुका पोलीस ठाण्याने महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ च्या कलम ६५ (ई) अंतर्गत अवैध दारूच्या साठ्यावर आणि विक्रीवर मोठी कारवाई केली. २७ व २८ ऑगस्ट रोजी तालुक्यातील आगळगाव, धनगरवाडी आणि धसपिंपळगाव परिसरात झालेल्या छाप्यांत पाच आरोपींना अटक करण्यात आली. या कारवाईत सुमारे ४,००० रुपयांहून अधिक किमतीची अवैध दारू आणि एक मोटारसायकल जप्त करण्यात आली. २७ ऑगस्ट रोजी आगळगाव येथे निलाबाई शंकर चव्हाण (वय ६०) यांच्याकडून ९ लिटर हातभट्टीची देशी दारू (किंमत ९०० रुपये) जप्त करण्यात आली. त्याच दिवशी धसपिंपळगाव येथे संतोष अर्जुन धस (वय ५१) यांच्याकडून रॉयल स्टॅग, क्लासिक गोल्ड व्हिस्की व देशी दारूच्या बाटल्या (एकूण २,७०० रुपये) तसेच काळ्या रंगाची हिरो एचएफ डीलक्स मोटारसायकल (आरटीओ क्रमांक एमएच १३ बीयू ५११२) जप्त करण्यात आली. एकूण मालमत्ता सुमारे ७७,७०० रुपये इतकी आहे. त्याच गावात दिनेश कैलास धस (वय ३४) यांच्याकडून क्लासिक गोल्ड, मॅकडॉल्स व्हिस्की आणि देश...

*कुर्डूवाडी बायपास चौकाजवळ मद्यधुंद अवस्थेत टेम्पो चालविणाऱ्या चालकावर पोलिसांनी केली कारवाई*

इमेज
*कुर्डूवाडी बायपास चौकाजवळ मद्यधुंद अवस्थेत टेम्पो चालविणाऱ्या चालकावर पोलिसांनी केली कारवाई* **KDM NEWS प्रतिनिधी बार्शी , २९ ऑगस्ट :** बार्शी तालुक्यातील अलिपूर हद्दीत दारूच्या नशेत आयशर टेम्पो चालवताना एका तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. मोटार वाहन अधिनियम १९८८ च्या कलम १८५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २७ ऑगस्ट रोजी सायंकाळी सुमारे ५.१५ वाजता कुडूवाडी बायपास चौक, चंडक पेट्रोलपंपाजवळ अलिपूर हद्दीत हा प्रकार घडला. आरोपी अमोल ज्ञानोबा उदारे (वय २८, रा. खुलगापूर, पोस्ट कासारखेडा, ता. जि. लातूर) याने आपल्या ताब्यातील आयशर टेम्पो (आरटीओ क्रमांक MH०४LE६६६१) दारूच्या नशेत रस्त्यावर चालविला होता. बार्शी तालुका पोलीस ठाण्यातील पोकाँ २१३४ रमेश महादेव माने यांनी याबाबत फिर्याद दिली. त्यानुसार दिनांक २७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६.३८ वाजता गु.र.नं. २७३/२०२६ दाखल करण्यात आला. घटनास्थळ पोलीस ठाण्यापासून पश्चिमेस सुमारे सात किलोमीटर अंतरावर आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास जगताप यांच्याकडे सोपविण्यात आला असून तपास सुरू आहे. सहा. पोलीस निरीक्षक, बार्शी तालुका पोलीस ठाणे यांनी ही नोंद केल...

*नरखेड-अनगर रोडवर भीषण अपघात; भरधाव मोटारसायकलच्या धडकेत वयोवृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू*

इमेज
*नरखेड-अनगर रोडवर भीषण अपघात; भरधाव मोटारसायकलच्या धडकेत वयोवृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू*  *KDM NEWS प्रतिनिधी सोलापूर, २८ ऑगस्ट   ता. मोहोळ येथील नरखेड गावात १३ ऑगस्ट रोजी सायंकाळी झालेल्या मोटारसायकल अपघातात एका वयोवृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू झाला. अपघाताबाबत मृतकाच्या मुलाने २५ ऑगस्ट रोजी पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे. मयत विष्णू संदिपान मोटे (वय ६४) हे वन विभागातून सेवानिवृत्त होऊन नरखेड येथे शेती करीत होते. कुटुंबाची उपजीविका शेतीवर अवलंबून होती. १३ ऑगस्ट रोजी सायंकाळी सुमारे ७.१५ वाजता ते आपल्या मोटारसायकल क्र. MH 13 AB 9535 वरून घरातून शेताकडे निघाले होते. काही वेळाने गावातील नागनाथ रंगनाथ राऊत यांनी मुलाला फोन करून अपघाताची माहिती दिली. अपघात नरखेड-अनगर रोडवर, नरखेड गावाच्या हद्दीत मच्छिंद्र सौदागर गोडसे यांच्या घरासमोर सुमारे ७.३० वाजता झाला. अनगरकडून नरखेडकडे भरधाव वेगाने येणारी मोटारसायकल क्र. MH 13 EQ 9527 समोरून जोरदार धडकली. धडकेत विष्णू मोटे रस्त्यावर पडले आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली. गावकऱ्यांनी त्यांना पाटील हॉस्पिटल, नरखेड येथे नेले. तिथल्या डॉ...

**पंढरपूर शहर: विनापरवाना वाळू वाहतूक करणारा टिपर जप्त; १६ लाखांचा मुद्देमाल**

इमेज
**पंढरपूर शहर: विनापरवाना वाळू वाहतूक करणारा टिपर जप्त; १६ लाखांचा मुद्देमाल**  KDM NEWS प्रतिनिधी पंढरपूर, २२ ऑगस्ट २०२६: पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात अवैध वाळू वाहतुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. इसबावी येथील जुना अकलुज रोडवर विनापरवाना अर्धा ब्रास वाळू नेणारा टाटा १८१६ कंपनीचा पांढरा टिपर (आरटीओ क्रमांक BR31Q9612) रस्त्यावर बंद पडलेल्या अवस्थेत सापडल्याने पोलिसांनी तो ताब्यात घेतला. घटना शुक्रवार, २१ ऑगस्ट रोजी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली. हॉटेल कोकणकडापासून सुमारे १०० मीटर अंतरावर अकलुजकडून पंढरपूरकडे जाणाऱ्या रस्त्यावर टिपर मिळाला. पंढरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल नवले व ठाकर हे पेट्रोलिंगवर असताना हे लक्षात आले. वाहनात अंदाजे अर्धा ब्रास वाळू होती आणि परवाना नव्हता. टिपर क्रेनच्या साहाय्याने ओढून शासकीय धान्य गोदामात जमा करण्यात आला. टिपरची अंदाजे किंमत १६ लाख रुपये तर वाळूची ३ हजार रुपये, एकूण मुद्देमाल १६ लाख ३ हजार रुपये आहे. चेसिस नंबर MAT449019F2E07275 आहे. ग्राम महसूल अधिकारी प्रमोद प्रभाकर खंडागळे (वय ३६, इसबावी) यांनी तहसिलदार पंढरपूर यांच्या पत...

*शेताच्या बांधावरून वाद: पिंपरी (पा) येथे शेतीच्या बांधावरील तुरी उपटल्याच्या कारणावरून शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला.*

इमेज
*शेताच्या बांधावरून वाद: पिंपरी (पा) येथे शेतीच्या बांधावरील तुरी उपटल्याच्या कारणावरून शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला.*  *KDM NEWS प्रतिनिधी, वैराग | २८ ऑगस्ट २०२६  बार्शी तालुक्यातील पिंपरी (पा) येथे शेतीच्या बांधावरील तुरी उपटल्याच्या आरोपावरून चार जणांनी एका शेतकऱ्यावर कुऱ्हाडीचे दांडे, लोखंडी गज, दगड आणि लाथाबुक्क्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी वैराग पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार, तो मागील तीन वर्षांपूर्वी गावातील शिवाजी नेमिनाथ भोसले यांच्याकडून सव्वादोन एकर शेती विकत घेतली होती. या शेतीच्या लगतच रामा गणपत भोसले यांची शेती आहे. त्यानंतर रामा गणपत भोसले व त्यांच्या कुटुंबीयांनी वेळोवेळी त्रास देण्याचे प्रकार सुरू असल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. घटना २० ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ७.३० वाजता घडली. फिर्यादी शेतातील पाण्याचे दार मोडण्यासाठी गट क्रमांक २९० मधील शेतात गेला होता. त्यावेळी शेजारील शेतात रामा गणपत भोसले व ओंकार रामा भोसले स्पिंकलरचे पाईप जोडत होते. त्यांनी फिर्यादी...

*दत्तक गावातच अवैध दारूचा बाजार; पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या गावातील कारवाईने उडाली खळबळ*

इमेज
*एसपींचे दत्तक गाव अन् दारूचा महापूर! बार्शीच्या धस पिंपळगावमध्ये ८० हजारांच्या अवैध दारूसह दोघांवर कारवाई*  *KDM NEWS प्रतिनिधी बार्शी *सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध दारू विक्रीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी आज धस पिंपळगाव येथे धडक कारवाई केली. बार्शी तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने दोन आरोपींना अटक केली असून देशी-विदेशी दारू मिळून एकूण ८० हजार २९० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. धस पिंपळगाव येथे काही इसम अवैधरीत्या दारू विक्री करत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ पथक तयार करून छापा टाकला. या कारवाईत संतोष अर्जुन धस आणि दिनेश कैलास धस (दोघेही राहणार धस पिंपळगाव, ता. बार्शी, ) यांच्यावर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बार्शी तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अक्षय सोनवणे यांनी कार्यभार स्वीकारल्यापासून दारू, मटका, जुगार आणि इतर अवैध धंद्यांवर सातत्याने कारवाई सुरू ठेवल्या आहेत. धस पिंपळगाव हे सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक...

*"तू आम्हाला गांजा का आणून देत नाहीस?"; बार्शीत सफाई कामगारावर चार जणांचा जीवघेणा हल्ला*

इमेज
*"तू आम्हाला गांजा का आणून देत नाहीस?"; बार्शीत सफाई कामगारावर चार जणांचा जीवघेणा हल्ला*  **KDM NEWS प्रतिनिधी बार्शी, २७ ऑगस्ट** : शहरातील बस स्टँडजवळ बुधवार सायंकाळी एका सफाई कामगाराला चार जणांनी मिळून शिवीगाळ करून मारहाण केली. याप्रकरणी बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी संदेश अरुण ननवरे (वय ३५, रा. भीमनगर बार्शी) यांनी पोलिसांकडे फिर्याद दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार, दि. २६ ऑगस्ट रोजी सायंकाळी सुमारे ७.२० वाजता प्रमोद कांबळे यांच्या पानटपरीजवळ (बस स्टँड बार्शी) आधी झालेल्या किरकोळ वादाबाबत बोलावून आरोपींनी “तू आम्हाला गांजा का आणून देत नाहीस, तुला लय माज आला आहे” असे म्हणत शिवीगाळ केली. त्यानंतर रोहन भैरवनाथ सुपेकर, अतिश रमेश चव्हाण, रमजान गनी शेख आणि मोहमद रफिक शेख (सर्व रा. बार्शी) यांनी मिळून लाथाबुक्क्याने मारहाण केली. जिवे मारण्याची धमकीही दिली. त्यापैकी एकाने हातातील स्टीलचे गोल कडे काढून फिर्यादीच्या डोक्यात मारले. त्यामुळे तो जखमी झाला. पोलीस ठाण्यापासून पूर्वेस सुमारे १०० मीटर अंतरावर ही घटना घडली. गुन्ह्यात वापरलेले हत्या...

*बार्शी शहर पोलिसांची कारवाई: अवैध दारूविक्री करणाऱ्या दोघांवर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल*

इमेज
*बार्शी शहर पोलिसांची कारवाई: अवैध दारूविक्री करणाऱ्या दोघांवर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल*  *KDM NEWS प्रतिनिधी बार्शी, २७ ऑगस्ट २०२६ – बार्शी शहर पोलीस ठाण्याने गुरुवारी दोन वेगवेगळ्या ठिकाणी अवैध दारू विक्री करणाऱ्यांविरुद्ध कारवाई केली. महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ६५ (ई) अंतर्गत दोन गुन्हे दाखल करण्यात आले असून एकूण ५३५० रुपये किंमतीची दारू जप्त करण्यात आली. पोलिस कॉन्स्टेबल सचिन भारत देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी सुमारे १.२० वाजता उपळाई रोडवरील रणवीर हॉटेलच्या पाठीमागील बाजूस दशरथ अर्जुन गोंदील (वय ३८, रा. शेंदरी, ता. बार्शी) याला बुलेट डार्क रमच्या १८० मिलीच्या १५ बाटल्या विक्री करताना पकडण्यात आले. प्रत्येक बाटलीची किंमत १५० रुपये असून एकूण २२५० रुपये किंमतीची दारू जप्त करण्यात आली. या प्रकरणात गुन्हा क्रमांक ६४०/२०२६ दाखल करण्यात आला. त्यानंतर दुपारी सुमारे २ वाजता गाडेगाव चौकातील रंगत हॉटेलच्या पाठीमागे कैलास हानुमंत कांदे (वय ३९, रा. बोरगाव, ता. बार्शी) याला दारू विक्री करताना अटक करण्यात आली. त्याच्याकडून क्लासिक गोल्ड व्ह...

**प्रेमभंगानं उघडला एमपीएससी औषध निरीक्षक पेपरफुटीचा घोटाळा; सहा जण अटकेत, भरती रद्द**

इमेज
*प्रेमभंगानं उघडला एमपीएससी औषध निरीक्षक पेपरफुटीचा घोटाळा; सहा जण अटकेत, भरती रद्द*  *KDM NEWS प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) अन्न व औषध प्रशासन विभागातील औषध निरीक्षक (गट-ब) पदाच्या चाळणी परीक्षेत प्रश्नपत्रिका फुटल्याचा प्रकार प्रेमभंगानं उघडकीस आला. मुंबई गुन्हे शाखेने या प्रकरणात सहा जणांना अटक केली असून एमपीएससीने संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द केली आहे. २२ मार्च २०२६ रोजी झालेल्या या परीक्षेसाठी सुमारे ४४,५०० उमेदवार बसले होते. १५४ राजपत्रित पदांसाठी ही परीक्षा घेण्यात आली होती. निकालानंतर ऋतुजा पाटील यांना सातवी क्रमांक मिळाला. मात्र त्यांचा प्रियकर लोकेश उर्फ गौरव राजेंद्र पाटील (२४, नंदुरबार) अपात्र ठरला. पोलिसांच्या तपासात समोर आले की, परीक्षेच्या दोन-तीन दिवस आधी नंदुरबार येथील कौटिल्य अकादमीचे संचालक प्रवीण पाटील यांच्यामार्फत प्रश्नपत्रिका मिळवली गेली. ऋतुजाचे वडील अमृत पाटील यांनी प्रवीण पाटील यांना सुमारे पाच लाख रुपये देऊन ही व्यवस्था केली. प्रश्नपत्रिका एमपीएससीतील अधिकाऱ्यांच्या मदतीने मिळवली गेल्याचा आरोप आहे. ऋतुजाने ही प्रश्...

*तीन पिढ्यांचे वैराख्य संपले! कव्हे गावातील हजारे परिवारांमधील ४२ वर्षांचा वाद पोलिसांच्या मध्यस्थीने मिटला*

इमेज
*तीन पिढ्यांचे वैराख्य संपले! कव्हे गावातील हजारे परिवारांमधील ४२ वर्षांचा वाद पोलिसांच्या मध्यस्थीने मिटला*  **KDM NEWS प्रतिनिधी बार्शी** | कव्हे गावातील सागर हजारे आणि सत्यवान हजारे यांच्या परिवारांमधील तब्बल ४२ वर्षांपासून सुरू असलेला संघर्ष अखेर संपला. तीन पिढ्यांमध्ये चालत आलेल्या या वैरामध्ये गंभीर गुन्हे दाखल झाले होते. त्यात कलम ३०७ सारख्या प्रयत्नपूर्वक हत्येच्या प्रकरणांचाही समावेश होता. वर्षानुवर्षे न्यायालयीन खटले चालत राहिल्याने दोन्ही बाजू त्रस्त झाल्या होत्या. बार्शी तालुका पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी दोन्ही परिवारांशी थेट संवाद साधला. कायदेशीर परिणाम, भविष्यातील अडचणी आणि या वादामुळे झालेले नुकसान स्पष्टपणे समजावून सांगितले. पोलीस उपनिरीक्षक सदाशिव गवळी, अमित घाडगे,  वैभव शिंदे, बाबासाहेब पाटील, डॉ. बुरगुटे तसेच इतर सामाजिक-राजकीय क्षेत्रातील व्यक्तींनीही मध्यस्थीत सहभाग घेतला. दोन्ही पक्षांनी जुना राग बाजूला ठेवून पोलिसांसमोर एकमेकांना गळाभेट घेतली. त्यांनी यापुढे शांततेने, सलोख्याने आणि बंधुभावाने राहण...

*सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूक: बोगस ठरावांच्या आरोपावरून राजकारण तापले; आमदार सुभाष देशमुख यांची सहनिबंधकांकडे तक्रार*

इमेज
*सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूक: बोगस ठरावांच्या आरोपावरून राजकारण तापले; आमदार सुभाष देशमुख यांची सहनिबंधकांकडे तक्रार*  *KDM NEWS प्रतिनिधी सोलापूर :** जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सहकार क्षेत्रात राजकीय तणाव वाढला आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांमध्ये कथित बोगस ठराव मंजूर करून मतदार यादी तयार केली जात असल्याचा गंभीर आरोप करत आमदार सुभाष देशमुख यांनी पुणे विभागीय सहनिबंधकांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. बँकेच्या निवडणुकीसाठी संस्थांचे प्रतिनिधी निश्चित करण्याची प्रक्रिया मागील दहा दिवसांपासून सुरू आहे. या ठराव सादर करण्याची मुदत ११ सप्टेंबरपर्यंत आहे. आमदार देशमुख यांच्या तक्रारीनुसार, काही संस्थांमध्ये सभासद व संचालकांना विश्वासात न घेता प्रोसिडिंग बुकवर सह्या घेतल्या जात आहेत. अधिकृत कार्यालयाबाहेर नियमबाह्य ठराव घेण्याचे प्रकारही सुरू असल्याचे नमूद करण्यात आले आहे. बोगस ठरावांच्या आधारे मतदार यादी तयार झाल्यास पात्र सभासद व संस्थांच्या संचालकांवर अन्याय होईल आणि निवडणुकीच्या निष्पक्षतेवर ...

*बार्शी हादरली! कॉलेजला जाते म्हणून निघालेली १७ वर्षीय विद्यार्थिनी गूढ रीतीने बेपत्ता; आईची पोलिसांत तक्रार*

इमेज
*बार्शी हादरली! कॉलेजला जाते म्हणून निघालेली १७ वर्षीय विद्यार्थिनी गूढ रीतीने बेपत्ता; आईची पोलिसांत तक्रार*  **KDM NEWS प्रतिनिधी बार्शी :** शहरातील अलीपूर रोड परिसरातील १७ वर्षीय बारावी सायन्स शाखेतील विद्यार्थिनी गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता आहे. कॉलेजला जाते असे सांगून सकाळी सायकलवरून घराबाहेर पडलेली मुलगी रात्रीपर्यंत परतली नाही. कुटुंबीयांनी शोध घेतला, पण तिचा ठावठिकाणा लागला नाही. तिच्या आईने बार्शी पोलिसांत अज्ञात व्यक्तीविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, ही अल्पवयीन विद्यार्थिनी महाराष्ट्र उच्च माध्यमिक विद्यालयात बारावी सायन्स शाखेत शिकते. २५ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता नेहमीप्रमाणे कॉलेजला जाते, असे सांगून ती सायकलवरून घरातून निघाली. सायंकाळी सात वाजेपर्यंत ती घरी परतत असे. मात्र त्या दिवशी ती न आल्याने आईने सायंकाळी ७.१५ वाजता तिच्या मोबाईलवर फोन केला. अनोळखी व्यक्तीने फोन उचलला आणि लगेच कट केला. नंतर मोबाईल बंद आढळला. वडिलांनी कॉलेज व स्टडी क्लासमध्ये चौकशी केली. वर्गातील विद्यार्थिनींनी सांगितले की, ती त्या दिवशी कॉलेजमध्ये आली...

*जिल्हा परिषद शाळांचे ‘ए, बी, सी, डी’ वर्गीकरण; मूलभूत सुविधांचा आढावा घेण्यासाठी आठ दिवसांची मुदत!*

इमेज
*जिल्हा परिषद शाळांचे ‘ए, बी, सी, डी’ वर्गीकरण; मूलभूत सुविधांचा आढावा घेण्यासाठी आठ दिवसांची मुदत!*  *KDM NEWS प्रतिनिधी मुंबई, २४ ऑगस्ट : राज्यातील जिल्हा परिषद शाळांमधील मूलभूत पायाभूत सुविधांचा आढावा घेऊन त्यांचे ‘ए, बी, सी, डी’ असे वर्गीकरण करण्याचे निर्देश ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिले आहेत. पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, वीज आणि वर्गखोल्यांची प्रत्यक्ष स्थिती तपासून आठ दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेशही त्यांनी दिले. सोमवारी मंत्रालयात शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीत हे निर्देश देण्यात आले. बैठकीस ग्रामविकास विभागाचे सचिव डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, शालेय शिक्षण विभागाचे सचिव रणजित सिंह देओल, दूरदृश्यप्रणालीद्वारे विभागीय आयुक्त, सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. शाळांचे वर्गीकरण करताना मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, पुरेशा व सुव्यवस्थित वर्गखोल्या तसेच वीज सुविधा यांचा प्राधान्याने विचार करण्याचे निर्देश मंत्री गोरे यांनी दिले. ...

*बार्शी तालुक्यात समाजकारणाच्या वादातून युवकावर जीवघेणा हल्ला; तलवार, लोखंडी पाईप व रॉडने मारहाण, तिघांवर गुन्हा दाखल!*

इमेज
*बार्शी तालुक्यात समाजकारणाच्या वादातून युवकावर जीवघेणा हल्ला; तलवार, लोखंडी पाईप व रॉडने मारहाण, तिघांवर गुन्हा दाखल!*  *KDM_NEWS_प्रतिनिधी बार्शी, २४ ऑगस्ट २०२६ : बार्शी तालुक्यातील फपाळवाडी येथे १९ ऑगस्ट रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास समाजकारणाच्या कारणावरून एका युवकावर तलवार, लोखंडी पाईप आणि रॉडने हल्ला करण्यात आला. फिर्यादी संजय विलास आरगडे (वय ३१, रियल इस्टेट व्यवसाय, रा. तावडी ता. बार्शी) यांना डोक्यात, हातांवर, नडग्यांवर आणि पाठीवर जखमा झाल्या असून ते सध्या बार्शीतील जगदाळे मामा हॉस्पीटलच्या न्युरो स्टेप डाउन युनिटमध्ये उपचार घेत आहेत. बार्शी तालुका पोलीस ठाण्यात गु.र.नं. २७०/२०२६ अंतर्गत बीएनएस कलम १०९, ११८ (२), ११८ (१), १२६ (२), ३५१ (२), ३५२ आणि ३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी म्हणून १) समाधान दादाराव मोरे (रा. तावडी), २) लक्ष्मण यादव (रा. जामगाव पा) आणि ३) महादेव झोडगे (रा. आरणगाव) यांची नोंद झाली आहे. हकिकतीनुसार, फिर्यादी मोटारसायकलवरून घरातून बार्शीकडे जात असताना मौजे फपाळवाडी येथील दत्ता दळवी यांच्या घरासमोरील रस्त्यावर आरोपींनी पांढऱ्या...

*बार्शी: 'तू माझ्याविरोधात खोट्या केसेस करतोस' म्हणत शेतकऱ्याच्या पाठीवर चाकूने वार; आरोपीवर गुन्हा दाखल*

इमेज
*बार्शी: 'तू माझ्याविरोधात खोट्या केसेस करतोस' म्हणत शेतकऱ्याच्या पाठीवर चाकूने वार; आरोपीवर गुन्हा दाखल*  *KDM NEWS प्रतिनिधी बार्शी, २५ ऑगस्ट २०२६ : बार्शी तालुक्यातील फपाळवाडी येथे १९ ऑगस्ट रोजी सकाळी साडेअकरा वाजता एका शेतकऱ्यावर चाकूने हल्ला करून जखमी करण्यात आले. आरोपीने पीडिताच्या पाठीवर वार केला, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, शिवीगाळ व दमदाटी केली आणि शर्टच्या खिशातून ४२०० रुपये जबरदस्तीने काढून घेतले. फिर्यादी समाधान दादाराव मोरे (वय ३५, शेती, रा. तावडी, ता. बार्शी) सध्या सुवीधा हॉस्पिटल, बार्शी येथे उपचार घेत आहेत. आरोपी संजय विलास आरगडे (रा. तावडी, ता. बार्शी) याच्याविरुद्ध बार्शी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. घटनेची हकिकत अशी : १९ ऑगस्ट रोजी सकाळी ११.३० वाजता सुमारास मौजे फपाळवाडी येथील सागर चव्हाण यांच्या किराणा दुकानाजवळ तावडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर फिर्यादी होता. त्यावेळी आरोपीने त्याच्याकडे येऊन म्हटले, “तू माझ्याविरोधात खोट्या केसेस करतोस, तुला लय नाज आला आहे.” त्यानंतर आरोपीने जवळील चाकूने फिर्यादीच्या पाठीवर वार केला. लाथाबुक्क्या...

*इन्स्टाग्रामची ओळख ठरली जीवघेणी; विवाहित महिलेशी संबंध ठेवणाऱ्या तरुणाची बेदम मारहाणीत हत्या*

इमेज
**इन्स्टाग्रामची ओळख ठरली जीवघेणी; विवाहित महिलेशी संबंध ठेवणाऱ्या तरुणाची बेदम मारहाणीत हत्या**  **KDM NEWS प्रतिनिधी सोलापूर:** इन्स्टाग्रामवरून ओळख झालेल्या ४२ वर्षीय विवाहित महिलेसोबतचे संबंध अखेर २७ वर्षीय तरुणाला महागात पडले. सोलापूर जिल्ह्यातील उत्तर सोलापूर तालुक्यातील तरटगाव येथील ट्रॅक्टर चालक अरविंद बाळू मस्के याची महिलेच्या पती, मुलगा आणि साथीदारांकडून बेदम मारहाण झाली. त्यात गंभीर जखमी झालेल्या अरविंदचा शनिवारी (२२ ऑगस्ट) सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. काही महिन्यांपूर्वी अरविंदची माळुंब्रा (तालुका तुळजापूर) येथील ४२ वर्षीय विवाहित महिलेशी इन्स्टाग्रामवर ओळख झाली. तीन महिने फोनवर बोलण्यानंतर एप्रिलमध्ये ती अरविंदच्या घरी आली आणि दोन दिवस राहिली. नंतर पुन्हा येऊन तिने लग्नाचा आग्रह धरला. दीड महिन्यांपूर्वी ती पुन्हा आली आणि सासरी परत गेलीच नाही. पती तिला न्यायला आला तेव्हा तिने नकार दिला आणि जिवाचे बरेवाईट करण्याची धमकी दिली. काही दिवसांनी महिला पतीच्या घरी गेली. १३ ऑगस्टला अरविंदने आईला सांगितले की महिला भेटायला बोलवत आहे. १५ ऑगस्ट...

**५७ तहसिलदारांना उप जिल्हाधिकारी पदावर तात्पुरती पदोन्नती; मतदार याद्यांच्या पुनरिक्षणानंतर पदस्थापना**

इमेज
**५७ तहसिलदारांना उप जिल्हाधिकारी पदावर तात्पुरती पदोन्नती; मतदार याद्यांच्या पुनरिक्षणानंतर पदस्थापना**  KDM NEWS प्रतिनिधी मुंबई, २० ऑगस्ट २०२६ : महसूल व वन विभागाने निवडसूची वर्ष २०२५-२६ साठी तहसिलदार संवर्गातील ५७ पात्र अधिकाऱ्यांना उप जिल्हाधिकारी संवर्गात निव्वळ तात्पुरत्या (तदर्थ) स्वरूपात पदोन्नती देण्याचे शासन आदेश जारी केले आहेत. **शासन आदेशाचे मुख्य मुद्दे :** - शासन आदेश क्र. पदोन्नती-१०२५/प्र.क्र. २४६/आस्था-२, दिनांक २० ऑगस्ट २०२६. - तहसिलदार (एस-१९ : रु. ५५,१००-१,७५,१००) यांना उप जिल्हाधिकारी (एस-२० : रु. ५६,१००-१,७७,५००) पदावर तात्पुरती पदोन्नती. - जेष्ठता क्रमांक २१२६ ते २४९९ पर्यंतच्या अधिकाऱ्यांचा समावेश. यात खुला, इ.मा.व., अ.जा., अ.ज., भ.ज.(क/ब/ड) आणि वि.जा.अ. प्रवर्गातील अधिकारी आहेत. - काही प्रमुख नावे : संदिपकुमार भोसले, महेश सावंत, मनिषा मेने, अमोल कदम, पुरुषोत्तम भुसारी, सुरेश काशीद, जयराज सुर्यवंशी, सुशील बेल्हेकर, सुरेंद्र देशमुख, जीवक्कुमार कांबळे, अनिलकुमार हेळकर, संतोष डोईफोडे, रविंद्र होळी, सुरेखा स्वामी, हरिश्चंद्र गाडे, प्रशांत सांगडे, सी...

**जमिनीतील ओलावा टिकवण्यासाठी अंतरमशागत करा; तालुका कृषी अधिकाऱ्यांचे शेतकऱ्यांना आवाहन**

इमेज
**जमिनीतील ओलावा टिकवण्यासाठी अंतरमशागत करा; तालुका कृषी अधिकाऱ्यांचे शेतकऱ्यांना आवाहन**  **KDM NEWS प्रतिनिधी बार्शी, १२ ऑगस्ट :** बार्शी तालुक्यात यंदाच्या खरीप हंगामातील पेरणीचा वेग वाढला असून एकूण पेरणी क्षेत्र सरासरीपेक्षा जास्त झाले आहे. तालुका कृषि अधिकारी कार्यालयाच्या साप्ताहिक अहवालानुसार, एकूण ७३ हजार १७७ हेक्टर सरासरी क्षेत्रापैकी आतापर्यंत ८७ हजार ४८४ हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. हे प्रमाण ११९.५५ टक्के आहे. सोयाबीनने सर्वाधिक वाढ दाखवली आहे. सरासरी ५६ हजार ४७२ हेक्टर क्षेत्राऐवजी ८२ हजार ८७५ हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली आहे. हे प्रमाण तब्बल १४६.७५ टक्के आहे. एकूण गळीतधान्यांचे पेरणी क्षेत्रही १४६.४६ टक्के गाठले आहे. अन्नधान्यांच्या पेरणीत मात्र मंदी दिसून येत आहे. एकूण अन्नधान्य पेरणी केवळ २७.७३ टक्के झाली आहे. यात तूर ३९.५६ टक्के, उडीद १७.७४ टक्के तर मूग केवळ ९.३६ टक्के पेरणी झाली आहे. मक्याची पेरणी ६३.८२ टक्के पूर्ण झाली आहे. भात, ज्वारी, बाजरी, राळा आणि राजगिरा या पिकांची पेरणी अद्याप सुरू झालेली नाही. तालुका कृषि अधिकाऱ्यांनी पावसाचा खंड अस...

**नागपुरात ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचा भव्य नागरी सत्कार; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान**

इमेज
**नागपुरात ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचा भव्य नागरी सत्कार; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान**  **KDM NEWS प्रतिनिधी नागपूर :** महाराष्ट्रभूषण, पद्मश्री ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचा ८० व्या वर्षात पदार्पण निमित्ताने बुधवारी (१९ ऑगस्ट) येथील डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात भव्य नागरी सत्कार करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा सन्मान प्रदान करण्यात आला. नागपूर महानगरपालिका, विदर्भ गौरव प्रतिष्ठान आणि श्री सिद्धीविनायक सेवा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या सोहळ्यात महापौर नीता ठाकरे, उपमहापौर लीला हाथीबेड, स्थायी समिती सभापती शिवानी दाणी-वाखरे, गटनेते नरेंद्र (बाल्या) बोरकर, माजी आमदार संदीप जोशी, विदर्भ गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. गिरीश गांधी, मनपा आयुक्त डॉ. विपीन इटनकर आदी मान्यवर उपस्थित होते. सन्मानचिन्हासोबत नागपूर महानगरपालिकेतर्फे पाच लाख रुपये, विदर्भ गौरव प्रतिष्ठानतर्फे ५१ हजार रुपये आणि सिद्धीविनायक सेवा ट्रस्टतर्फे एक लाख रुपये असे धनादेश देण्यात आले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “मराठी माणसाच्या जीवनातील संघर्ष, वास्तव, मर्य...

**बार्शी: १७ वर्षीय विद्यार्थिनीचा छळ करणाऱ्या तरुणावर BNS आणि POCSO कायद्यानुसार कारवाई**

इमेज
**बार्शी: १७ वर्षीय विद्यार्थिनीचा छळ करणाऱ्या तरुणावर BNS आणि POCSO कायद्यानुसार कारवाई**  *KDM NEWS प्रतिनिधी बार्शी, १७ ऑगस्ट २०२६ : बार्शी शहरातील शिवाजी महाविद्यालयाजवळ १३ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास ११ वी सायन्सच्या १७ वर्षीय विद्यार्थिनीला दोन अनोळखी तरुणांनी स्कुटीवरून पाठीमागून येऊन छळ केल्याची घटना उघडकीस आली आहे. पीडितेच्या वडिलांच्या तक्रारीवरून बार्शी शहर पोलीस ठाण्यात आज गुन्हा दाखल करण्यात आला. फिर्यादीनुसार, मुलगी आयडेंटिटी साईज फोटो आणण्यासाठी मैत्रिणीसोबत जात असताना पाठीमागून स्कुटीवरून दोन तरुण आले. गाडी चालवणार्‍याने तिला “तू चालत का जात आहेस, माझ्यासोबत स्कुटीवर चल, मी तुला सोडतो” असे सांगितले. उत्तर न दिल्याने ते पुन्हा जवळ आले व “हातातील अंगठी घे, आणखी काय हवे ते देतो, पण सोबत चल” असे म्हणत वारंवार त्रास दिला. नंतर रिक्षा स्टॉपजवळ पुन्हा येऊन मुलीला घाणेरड्या शिव्या देत लज्जास्पद वर्तन केले आणि गाडीवरून निघून गेले. वडिलांनी नर्सिंग कॉलेजच्या सीसीटीव्ही फुटेज पाहून घटना निश्चित केली. नंतर तपासात आरोपी शेखर पोपट वाघमारे (रा. सिद्धार्थनग...

**दाराचं कुलूप तोडलं अन् कपाटात हात घातला... शेंद्री गावात मध्यरात्रीच्या घरफोडीने प्रचंड खळबळ!**

इमेज
**दाराचं कुलूप तोडलं अन् कपाटात हात घातला... शेंद्री गावात मध्यरात्रीच्या घरफोडीने प्रचंड खळबळ!**  *KDM NEWS प्रतिनिधी बार्शी**१९ ऑगस्ट  बार्शी तालुक्यातील शेंद्री गावात अज्ञात चोरट्याने घरफोडी करून सुमारे एक लाख एकेचाळीस हजार पाचशे रुपये किमतीचे सोन्याचे व चांदीचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली आहे. बार्शी तालुका पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा क्रमांक २६२/२०२६ दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी शहाजी अरुण चव्हाण (वय ३४, व्यवसाय मजुरी, रा. शेंद्री ता. बार्शी जि. सोलापूर) यांच्या घरी दिनांक १३ ऑगस्ट रोजी रात्री १०.३० ते १४ ऑगस्ट रोजी रात्री २.०० या दरम्यान ही चोरी झाली. अज्ञात चोरट्याने घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर लॉक असलेल्या कपाटाचे लॉक तोडून सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले. चोरीला गेलेल्या मालात पाच ग्रॅमची सोन्याची अंगठी (४५ हजार रुपये), सव्वादोन ग्रॅमची सोन्याची अंगठी (१२ हजार रुपये), साडेपाच ग्रॅमचे गळ्यातील सोन्याचे गंठण (४७ हजार ५०० रुपये), दिड ग्रॅमची कानातील सोन्याची फुले (७ हजार ५०० रुपये), दोन सोन्याच्या नथी (७ हजार ५०० रुपये), अर्धा...

**सोलापूर सैनिकी मुलींच्या वसतिगृहात स्वयंपाकी पदासाठी भरती; २४ ऑगस्टला मुलाखती**

इमेज
**सोलापूर सैनिकी मुलींच्या वसतिगृहात स्वयंपाकी पदासाठी भरती; २४ ऑगस्टला मुलाखती**  KDM NEWS प्रतिनिधी सोलापूर, दि. १९ (जिमाका) – जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सोलापूर यांच्या अधिपत्याखालील सैनिकी मुलींचे वसतिगृह, सोलापूर येथे अशासकीय स्वयंपाकीचे एक पद भरावयाचे आहे. या पदासाठी दरमहा १४ हजार १०६ रुपये मानधन देण्यात येणार आहे. स्वयंपाकी पदासाठी माजी सैनिक तसेच माजी सैनिकांच्या विधवा पत्नींना प्राधान्य देण्यात येणार आहे. स्वयंपाकी म्हणून कामाचा अनुभव असलेल्या उमेदवारांना विशेष प्राधान्य राहील. माजी सैनिक किंवा माजी सैनिकांच्या विधवा पत्नी यांच्यापैकी पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्यास नागरी जीवनातील पात्र उमेदवारांचाही विचार करण्यात येणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील पात्र माजी सैनिक तसेच माजी सैनिकांच्या विधवा पत्नींनी सैनिक सेवेची कागदपत्रे तसेच इतर शैक्षणिक कागदपत्रे दि. २४ ऑगस्ट २०२६ पूर्वी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सोलापूर येथे जमा करावीत. पात्र उमेदवारांच्या मुलाखती दि. २४ ऑगस्ट २०२६ रोजी घेण्यात येणार आहेत. उमेदवारांनी मुलाखतीस उपस्थित राहताना सर्व मूळ कागदपत्रे तसेच वैद...

**BREAKING: बार्शी-ताडसौदणे रोडवर पोलिसांची धाड; गांजा विकणाऱ्या दोघांच्या आवळल्या मुसक्या!**

इमेज
**BREAKING: बार्शी-ताडसौदणे रोडवर पोलिसांची धाड; गांजा विकणाऱ्या दोघांच्या आवळल्या मुसक्या!** KDM NEWS प्रतिनिधी बार्शी, १९ ऑगस्ट : बार्शी शहर पोलीस ठाण्याने अंमली पदार्थांच्या विक्रीविरोधात कारवाई करत दोन आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून एकूण २९८.९२ ग्रॅम गांजा व विक्रीतून मिळालेली रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी अमली पदार्थ आणि मनोविकारी पदार्थ अधिनियम १९८५ चे कलम ८(क), २०(ब)(ii)(अ), २९ तसेच भारतीय न्याय संहिता कलम ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा क्रमांक ६२४/२०२६ अंतर्गत फिर्याद अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष, सोलापूर ग्रामीण येथील सपोफौं विश्वजीत भाऊसाहेब हंचे (वय ५२) यांनी दाखल केली. आरोपींची नावे पांडूरंग नामदेव गोडेराव (वय ४९) व नागेश सदाशिव विभुते (वय ४०) असून दोघेही पंकज नगर, बार्शी ता. बार्शी येथे राहणारे आहेत. १८ ऑगस्ट रोजी सायंकाळी सुमारे ७.३२ वाजता बार्शी ते ताडसौदणे रोडवरील श्री. गोपाळ हॉटेलच्या पाठीमागील मोकळ्या जागेत आरोपींना विक्रीसाठी गांजा बाळगताना पोलिसांनी पकडले. घटनास्थळ बार्शी शहर पोलीस ठाणे हद्दीत उत्तरेस सुमारे तीन ...

**मोहोळ : कत्तलीसाठी जनावरे नेणाऱ्या पिकअपसह तिघे ताब्यात; तीन गाई व एक वासरू जप्त**

इमेज
**मोहोळ : कत्तलीसाठी जनावरे नेणाऱ्या पिकअपसह तिघे ताब्यात; तीन गाई व एक वासरू जप्त**  KDM NEWS प्रतिनिधी मोहोळ, १६ ऑगस्ट २०२६ : पुणे-सोलापूर रस्त्यावर मोहोळ सीमा परिसरात कत्तलीसाठी जनावरे नेत असल्याच्या संशयावरून मोहोळ पोलिसांनी महिंद्रा बोलेरो पिकअपसह तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. पिकअपमध्ये तीन मोठ्या देशी गाई आणि एक पाच दिवसांचे वासरू चारा-पाण्याची सोय न करता दाटीवाटीने भरलेले आढळले. गोरक्षा सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे येथील सेवक आकाश निवृत्ती धर्मे (२९, रा. फुरसुंगी, पांडव दंड लेन क्र. १, पुणे) यांनी रविवारी सकाळी सुमारे ११.३० वाजता खाजगी कामासाठी पुणेहून सोलापूरकडे येत असताना ही घटना नजरेस आली. त्यांनी पिकअप (क्रमांक केए ३२ डी १८७२) थांबवून तपासणी केली असता चालकाने फक्त दोन जनावरांचे खरेदी पावत्या दाखवल्या. इतर जनावरांची वैद्यकीय तपासणीही झालेली नव्हती. यामुळे जनावरे कत्तलीसाठी नेत असल्याची खात्री झाल्यानंतर धर्मे यांनी तिघांना पिकअपसह मोहोळ पोलीस ठाण्यास आणले. आरोपींची नावे : लक्ष्मण पिरप्पा होसमनी (२९, रा. सुदर्शन अपार्टमेंट, सर्वे क्र. १४/१अ/१३/१३१४...

**सर्पदंश आता अधिसूचित आजार; प्रत्येक प्रकरण आणि मृत्यूची नोंद बंधनकारक**

इमेज
**सर्पदंश आता अधिसूचित आजार; प्रत्येक प्रकरण आणि मृत्यूची नोंद बंधनकारक**  KDM NEWS प्रतिनिधी मुंबई, १८ ऑगस्ट : राज्यात सर्पदंशामुळे होणारे मृत्यू आणि अपंगत्व रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने सर्पदंशाला राज्यभरात ‘अधिसूचित आजार’ म्हणून घोषित केले आहे. या अधिसूचनेनुसार शासकीय-खासगी रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालये आणि सर्व डॉक्टरांना संशयित, संभाव्य किंवा निश्चित सर्पदंशाच्या प्रत्येक घटनेची तसेच त्यामुळे झालेल्या मृत्यूची नोंद संबंधित आरोग्य प्राधिकरणाकडे करणे कायद्याने बंधनकारक झाले आहे. सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले की, या निर्णयामुळे सर्पदंशाच्या घटनांचे अचूक संनियंत्रण, वेळेवर उपचार आणि सर्पविष प्रतिबंधक लस (एएसव्ही) उपलब्धतेचे नियोजन अधिक सक्षम होईल. ग्रामीण व दुर्गम भागात सर्पदंशाचा धोका जास्त असल्याने वेळेत निदान, प्रथमोपचार आणि लस उपलब्ध करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. **नोंदणी व देखरेख व्यवस्था**   आरोग्य संस्थांना प्रत्येक रुग्णाची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी किंवा जिल...

**सोलापूर ग्रामीण : वैराग-सोलापूर रोडवर मोटरसायकल अपघात; ४५ वर्षीय शेखनुर शेख यांचा मृत्यू, अज्ञात चालकावर गुन्हा**

इमेज
**सोलापूर ग्रामीण : वैराग-सोलापूर रोडवर मोटरसायकल अपघात; ४५ वर्षीय शेखनुर शेख यांचा मृत्यू, अज्ञात चालकावर गुन्हा**  **KDM NEWS प्रतिनिधी बार्शी **सोलापूर जिल्ह्यातील वैराग पोलीस ठाणे हद्दीत २९ जुलै २०२६ रोजी रात्री साडेसात ते सात चाळीस वाजता शेळगाव (आर) ता. बार्शी गावाच्या पुढे वैराग-सोलापूर रोडवर एका भीषण मोटरसायकल अपघातात ४५ वर्षीय शेखनुर दगडू शेख (रा. गणेश नगर बाळे, ता. उत्तर सोलापूर) यांचा मृत्यू झाला. अपघातात त्यांच्या मोटरसायकलला सुमारे पाच हजार रुपयांचे नुकसान झाले. मृताच्या मुलाने १० ऑगस्ट रोजी वैराग पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने पोलीसांनी अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी साहिल शेखनुर शेख (वय १९, शिक्षण  यांनी दिलेल्या जबाबात सांगितले की, त्यांचे वडील २९ जुलै रोजी दुपारी दोन वाजता त्यांच्या मोटरसायकल (एमएच १३ डीएफ १३५४) वरून बाळे येथून धामणगाव ता. बार्शी येथील आत्याकडे गेले होते. रात्री आठ वाजता आत्याचा मुलगा शौकत महुलाला शेख यांनी फोन करून सांगितले की, धामणगावहून सोलापूरकडे येताना रात्री साडेसात वाजता शेळगाव (आर) गावाच्या पुढे एका मोटरस...

**जळगाव : ग्रामसभेत शिवीगाळ-पाठलागानंतर ग्रामसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; सहा जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा**

इमेज
**जळगाव : ग्रामसभेत शिवीगाळ-पाठलागानंतर ग्रामसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; सहा जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा**  KDM NEWS प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील शिवरे गावात १६ ऑगस्ट रोजी झालेल्या ग्रामसभेदरम्यान एक दुःखद घटना घडली. ग्रामसेवक पी. एन. पाटील यांना काही ग्रामस्थांकडून शिवीगाळ, हुल्लडबाजी आणि मारहाणीचा प्रयत्न झाल्यानंतर तीव्र मानसिक तणाव आला. त्यांना हृदयविकाराचा झटका येऊन उपचारादरम्यान मृत्यू झाला. ग्रामसभेत विविध प्रश्नांवर चर्चा सुरू असताना काही तरुण आक्रमक झाले. त्यांनी सरपंच आणि ग्रामसेवक पाटील यांना टार्गेट करत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली व मारहाण करण्याचा प्रयत्न केला. यामुळे पाटील अस्वस्थ झाले. त्यांनी सभा अर्धवट सोडून स्वतःच्या दुचाकीने पारोळा सिव्हिल रुग्णालयाकडे प्रस्थान केले. मात्र काही तरुणांनी त्यांचा पाठलाग केला. या पाठलागाने त्यांचा तणाव आणखी वाढला. रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांना जोरदार हृदयविकाराचा झटका आला आणि प्राण गमावला. मृत्यूची बातमी पसरताच परिसरातील ग्रामसेवक संघटनांच्या अधिकाऱ्यांनी पारोळा पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन क...

**बार्शीत महिला-मुलींच्या सुरक्षिततेसाठी उच्च प्रतीचे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी**

इमेज
**बार्शीत महिला-मुलींच्या सुरक्षिततेसाठी उच्च प्रतीचे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी**  KDM NEWS प्रतिनिधी बार्शी, दि. १८ : बार्शी शहरातील महिला, मुली, विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रमुख ठिकाणी उच्च प्रतीचे सीसीटीव्ही कॅमेरे तातडीने बसविण्याची मागणी विरोधी पक्षनेते अॅड. नागेश अक्कलकोटे यांनी केली आहे. त्यांनी शहर पोलीस ठाणे, नगरपरिषद मुख्याधिकारी आणि तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी यांना याबाबत निवेदन दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की, मागील काही महिन्यांपासून शाळा-महाविद्यालय परिसरात मुलींचा पाठलाग, छेडछाड, अल्पवयीन मुलींच्या विनयभंगाचे प्रकार, मुलींना फूस लावून पळवून नेण्याचे प्रसंग, महिलांच्या गळ्यातील दागिन्यांची चोरी, घरफोडी, बाजारपेठेत मोबाईल व दुकान चोरी तसेच मोटारसायकल चोरी यांसारख्या घटना वाढत आहेत. शाळा-महाविद्यालय परिसरात ट्रिपल सीट, बिगर नंबर प्लेटची वाहने, मुलींच्या दिशेने वाहनांची रेस आणि हुल्लडबाजी याबाबतही तक्रारी येत आहेत. सायंकाळी चौक-बाजारपेठा व रहिवासी भागात तरुणांची टोळकी जमणे, मोटारसायकली आडव्या लावणे, वाढद...