सगे सोयरे कायद्याच्या अधिसूचना अंतिम करण्याला आला वेग .
सगळे सोयरे अधिसूचना अंतिम करण्याच्या हालचालींना आता आला वेग जरांगे पाटील यांना आश्वासन दिले होते त्याप्रमाणेच एका महिन्यांच्या आत सगेसोयरे अधिसूचना अंतिम करण्यासाठी राज्य सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत. कुणबी नोंदी सापडतील त्यांच्या सगेसोयऱ्यांनाही कुणबी दाखले देण्याबाबत हरकती सूचनांसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली ही अधिसूचना एका महिन्यांच्या आत अंतिम करण्यासाठी सर्व प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी प्रशासनाला दिल्या.मराठा समाजाच्या कुणबी नोंदी शोधण्यासाठी राज्य सरकारने निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे. या समितीने आतापर्यंत मराठा समाजाच्या ५७ लाख कुणबी नोंदी शोधल्या आहेत. अशा नोंदी सापडलेल्यांच्या सगेसोयऱ्यांनाही नातेसबंध तपासून कुणबी दाखले देण्याची मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली होती. ही मागणी राज्य सरकारने मान्य करीत यासंबंधीच्या अधिसूचनेचा मसुदा हरकती व सूचनासाठी प्रसिद्ध केला होता. मात्र, लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागेपर्यंत ही अधिसूचना अंतिम ...