सहा वर्षाच्या चीमुकलीवर अत्याचार करून खून जळगाव हादरल .
एका सहा वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करत तिची हत्या करण्यात आल्याची घटना जामनेर तालुक्यात घडली आहे. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना चिंचखेड गाव शिवारात घडल्याचं समोर आलं. चिंचखेड गाव परिसरात राहणारे आदिवासी कुटुंब मजुरीसाठी बाहेर गेले असताना, घरात असलेल्या सहा वर्षीय मुलीला फुस लाऊन गावाबाहेर नेऊन तिच्यावर अत्याचार करत हत्या केल्याचे उघड झाले आहे. दरम्यान, या घटनेतील मुलीचे आई वडील मजुरी करुन घरी परतले असता त्यांना मुलगी घरात दिसून आली नाही. त्यानंतर आई वडिलांनी मुलीची शोधा शोध सुरु केली. यावेळी चिमुकल्या मुलीचा गावाबाहेर केळीच्या बागेत रक्तबंबाळ अवस्थेत मृतदेह आढळून आला. काल रात्री 11 वाजता हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी या घटनेचा तपास सुरु केला आहे. गावातील एका संशायीत तरुणाचा शोध सुरु केला आहे.या घटनेत ज्या क्रूरतेने आरोपीने या बालिकेवर अत्याचार करुन तिची हत्या केली आहे. ती पाहता आरोपीला कठोर शिक्षा करण्यात यावी, अशी मागणी जनतेतून केली जात आहे.
टिप्पण्या