पोस्ट्स

शिवकाशी फायनान्सचा दावा न्यायालयाने फेटाळला: विधवा महिलेची सावकारी पाशातून मुक्तता

इमेज
शिवकाशी फायनान्सचा दावा न्यायालयाने फेटाळला: विधवा महिलेची सावकारी पाशातून मुक्तता बार्शी – बार्शी येथील मे. वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयाने शिवकाशी फायनान्सच्या बेकायदेशीर सावकारीच्या दाव्याला फेटाळून दिला, ज्यामुळे लक्ष्मी विजय डमरे आणि तिच्या मुलाला मोठा दिलासा मिळाला आहे. न्यायाधीश श्रीमती रेवती कंटे यांनी हा निर्णय दिला, ज्यामुळे सावकारी पाशात अडकलेल्या नागरिकांसाठी आशेचा किरण निर्माण झाला आहे. शिवकाशी फायनान्सने लक्ष्मी डमरे व तिच्या मुलांवर ७,९७,६९३ रुपयांचा दावा केला होता, परंतु अॅड. प्रशांत शेटे यांनी युक्तिवाद केला की, कंपनीने महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४चे उल्लंघन केले आहे. कर्जाच्या वैधतेसाठी आवश्यक कागदपत्रे दाखल केली गेली नव्हती, त्यामुळे न्यायालयाने दाव्याला नकार दिला. या प्रकरणामुळे सावकारीच्या अन्यायाच्या विरोधात मोठा आवाज उठला आहे. बार्शी आणि आसपासच्या भागात बेकायदेशीर सावकारी व्यवसाय करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करण्याची आवश्यकता आहे. जिल्हा प्रशासनाला याबाबत कठोर पावले उचलण्याची गरज आहे, अन्यथा गरीब कुटुंबांना आर्थिक त्रास सोसावा लागेल. नागरिकांन...

विवाहितेची आत्महत्या,पतीसह चौघाविरुद्ध विरुद्ध गुन्हा दाखल.

इमेज
विवाहितेची आत्महत्या, बार्शी तालुका पोलीस ठाण्यात पतीसह चौघाविरुद्ध विरुद्ध गुन्हा दाखल. बापूराव धर्मा गुंड वय ४५ रा. सावळेश्वर ता. मोहोळ जि. सोलापूर यांनी दिलेल्या दि. २५सप्टेंबर २०२४रोजी फिर्यादीनुसार त्यांच्या मुलीला सासरच्या लोकांनी संगणमत करून चारित्र्यावर संशय घेऊन आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याने पानगाव ता. बार्शी येथील पतीसह चौघांवर गुन्हा दाखल झाला असून यात पती सुधाकर सोमनाथ सातपुते याला पोलिसांनी अटक केली असून ,यातील हकीकत अशी . फिर्यादीची मुलगी तृप्ती सुधाकर सातपुते हिला पानगाव मध्ये दिले होते दि. १० ऑक्टोबर २०२२रोजी पासून ते दि.२४ सप्टेंबर २०२४ रात्री आठ वाजेपर्यंत पानगाव तालुका बार्शी तृप्ती सुधाकर सातपुते वय २४ वर्षे रा. पानगाव तालुका बार्शी पती सुधाकर सोमनाथ सातपुते यांनी चारित्र्यावर संशय घेऊन मारहाण करून सासू व सासरा सोमनाथ सातपुते व दीर बिरू सोमनाथ सातपुते सर्व रा. पानगाव ता. बार्शी या सासरच्या लोकांनी संगणमंत करून वेळोवेळी चारित्र्यावर संशय घेऊन शिवीगाळ करून शारीरिक व मानसिक त्रास देऊन आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याने  ,तिने दिनांक २४ सप्टेंबर ...