विवाहितेची आत्महत्या,पतीसह चौघाविरुद्ध विरुद्ध गुन्हा दाखल.

विवाहितेची आत्महत्या, बार्शी तालुका पोलीस ठाण्यात पतीसह चौघाविरुद्ध विरुद्ध गुन्हा दाखल.

बापूराव धर्मा गुंड वय ४५ रा. सावळेश्वर ता. मोहोळ जि. सोलापूर यांनी दिलेल्या दि. २५सप्टेंबर २०२४रोजी फिर्यादीनुसार त्यांच्या मुलीला सासरच्या लोकांनी संगणमत करून चारित्र्यावर संशय घेऊन आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याने पानगाव ता. बार्शी येथील पतीसह चौघांवर गुन्हा दाखल झाला असून यात पती सुधाकर सोमनाथ सातपुते याला पोलिसांनी अटक केली असून ,यातील हकीकत अशी .
फिर्यादीची मुलगी तृप्ती सुधाकर सातपुते हिला पानगाव मध्ये दिले होते दि. १० ऑक्टोबर २०२२रोजी पासून ते दि.२४ सप्टेंबर २०२४ रात्री आठ वाजेपर्यंत पानगाव तालुका बार्शी तृप्ती सुधाकर सातपुते वय २४ वर्षे रा. पानगाव तालुका बार्शी पती सुधाकर सोमनाथ सातपुते यांनी चारित्र्यावर संशय घेऊन मारहाण करून सासू व सासरा सोमनाथ सातपुते व दीर बिरू सोमनाथ सातपुते सर्व रा. पानगाव ता. बार्शी या सासरच्या लोकांनी संगणमंत करून वेळोवेळी चारित्र्यावर संशय घेऊन शिवीगाळ करून शारीरिक व मानसिक त्रास देऊन आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याने 

,तिने दिनांक २४ सप्टेंबर २०२४रोजी रात्री आठच्या दरम्यान ते २५सप्टेंबर २०२४ रोजी दुपारी एक वाजता दरम्यान पानगाव ब येथील गावाजवळील तलावाच्या पाण्यात उडी मारून आत्महत्या केली आहे, अशा प्रकारचा गुन्हा बार्शी तालुका ग्रामीण पोलीस ठाण्यात पती सह चौघांवर दाखल झाला असून, पतीस अटक झाली असून पुढील तपास बार्शी तालुका पोलीस करत आहे.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

**ऑनलाइन रम्मीच्या व्यसनाने घेतला तिघांचा बळी; धाराशिवच्या बावी गावात कुटुंबाचा करुण अंत**

**बार्शीत १३ वर्षीय मुलाचे अपहरण; पोलिसांचा शोध सुरू**

मुख्याध्यापकांची निर्दोष मुक्तता: बार्शी न्यायालयाचा निकाल