*जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी ७ फेब्रुवारीला भरपगारी सुट्टी अनिवार्य; १२ जिल्ह्यांत मतदान, राज्य सरकारचा आदेश*
*जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी ७ फेब्रुवारीला भरपगारी सुट्टी अनिवार्य; १२ जिल्ह्यांत मतदान, राज्य सरकारचा आदेश* *KDM NEWS प्रतिनिधी मुंबई, दि. २ फेब्रुवारी : महाराष्ट्रातील १२ जिल्हा परिषदा आणि त्यांच्याअंतर्गत येणाऱ्या १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शनिवार, ७ फेब्रुवारी २०२६ रोजी मतदान होणार आहे. या दिवशी राज्यातील सर्व मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्याची संधी मिळावी म्हणून उद्योग, आस्थापना, कारखाने आणि इतर व्यावसायिक संस्थांमधील कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी किंवा विशेष सवलत देणे बंधनकारक करण्यात आले आहे. उद्योग, ऊर्जा, कामगार आणि खनिकर्म विभागाने याबाबत परिपत्रक जारी केले असून, याचे उल्लंघन झाल्यास संबंधित आस्थापनांवर कारवाई होऊ शकते. राज्य निवडणूक आयोगाने मूळ कार्यक्रमानुसार ५ फेब्रुवारीला मतदान आणि ७ फेब्रुवारीला मतमोजणी जाहीर केली होती. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर झाल्याने निवडणूक कार्यक्रमात बदल करण्यात आला. आता ७ फेब्रुवारीला सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० पर्यंत मतदान होईल, ...