*नायब तहसिलदार संजीवन मुंढे यांना तहसिलदार पदावर बढती; २०२५-२६ निवडसूचीत आरक्षण वादानंतर विशेष तरतूद*
*नायब तहसिलदार संजीवन मुंढे यांना तहसिलदार पदावर बढती; २०२५-२६ निवडसूचीत आरक्षण वादानंतर विशेष तरतूद* *KDM NEWS प्रतिनिधी मुंबई, २७ फेब्रुवारी २०२६ महाराष्ट्र महसूल विभागाने नायब तहसिलदार संजीवन मच्छिंद्र मुंढे यांना तहसिलदार पदावर *तात्पुरत्या स्वरूपात तदर्थ पदोन्नती* जाहीर केली आहे. ही पदोन्नती २०२५-२६ च्या निवडसूचीतील विशेष प्रकरणातून देण्यात आली असून, शासन आदेश क्र. संकीर्ण-२०२६/प्र.क्र.१९/आस्था-३ (दिनांक २७ फेब्रुवारी २०२६) नुसार लागू झाली आहे. श्री. मुंढे यांना नायब तहसिलदार संवर्गातील वेतनश्रेणी एस-१४ (रु. ३८,६००-१,२२,८००) वरून तहसिलदार संवर्गातील एस-१९ (रु. ५५,१००-१,७५,१००) वर ही बढती मिळाली आहे. ही बढती *केवळ तात्पुरती*असून, त्यामुळे नियमित पदोन्नती किंवा ज्येष्ठतेचा कोणताही कायमस्वरूपी हक्क निर्माण होणार नाही. प्रकरणाची माहिती २०२५-२६ च्या निवडसूचीत ८५ नायब तहसिलदार तहसिलदार पदासाठी पात्र ठरले होते. काही अधिकाऱ्यांनी आरक्षण लाभ घेतल्याबाबत आक्षेप घेतले होते. श्री. मुंढे यांना सुरुवातीला आरक्षणाच्या मुद्द्यावरून पदोन्नती नाक...